शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

मीडियाटेक डायमेन्सिटी 8200 प्रोसेसर असलेला जगातील पहिला फोन लाँच; मिळतील अनेक जबरदस्त फीचर्स 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2022 18:15 IST

फोनमध्ये 6.7-इंच फुल-एचडी प्लस (2400×1080 पिक्सेल) रिझोल्यूशन असलेली एमोलेड डिस्प्ले आहे.

नवी दिल्ली : हँडसेट निर्मात्या कंपनी आयक्यूने आपला नवीन स्मार्टफोन iQOO Neo 7 SE ग्राहकांसाठी लाँच केला आहे. विशेष म्हणजे, हा नवीनतम iQoo मोबाईल फोन जगातील पहिला स्मार्टफोन आहे, ज्यामध्ये कंपनीने स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी मीडियाटेक डायमेन्सिटी 8200 चिपसेट वापरला आहे. या Neo 7 SE मॉडेलच्या किंमती आणि फीचर्सबद्दल सविस्तर जाणून घ्या...

डिस्प्ले : फोनमध्ये 6.7-इंच फुल-एचडी प्लस (2400×1080 पिक्सेल) रिझोल्यूशन असलेली एमोलेड डिस्प्ले आहे. या डिव्हाइसमध्ये 120 हर्ट्जचा रीफ्रेश रेट मिळत आहे आणि हा हँडसेट 20:9 आस्पेक्ट रेशोसह येतो.

प्रोसेसर : स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी मीडियाटेक डायमेन्सिटी 8200 ऑक्टा-कोर चिपसेटचा वापर करण्यात आला आहे.

बॅटरी क्षमता : 120 वॅट फास्ट चार्ज सपोर्टसह 5000 एमएएच बॅटरी फोनला चार्ज करण्यासाठी देण्यात आली आहे.

कॅमेरा सेटअप : आयक्यू  Neo 7 SE स्मार्टफोनच्या मागील पॅनलवर एक ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे, त्यात 64-मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा सेन्सर, 2-मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा सेन्सर आणि 2-मेगापिक्सलचा डेप्थ कॅमेरा सेन्सर आहे. जसे की,  Neo 6 SE 5G मध्ये अल्ट्रावाइड कॅमेरा सेन्सर दिलेला असल्याने, या डिव्हाइसमध्ये तुम्हाला हा सेन्सर नसल्याचे भासू शकते. सेल्फी प्रेमींसाठी, फोनच्या पुढील भागात 16-मेगापिक्सेल कॅमेरा सेन्सर आहे.

'या' स्मार्टफोनची किंमतकंपनीने हा आयक्यू स्मार्टफोन पाच वेगवेगळ्या व्हेरिएंटमध्ये लाँच केला आहे. याच्या बेस व्हेरिएंटमध्ये 8 GB रॅमसह 128 GB स्टोरेज आहे, या मॉडेलची किंमत 2099 चीनी युआन (सुमारे 24 हजार 800 रुपये) आहे. 8 जीबी रॅम असलेल्या 256 जीबी व्हेरिएंटची किंमत 2299 चीनी युआन (सुमारे 27 हजार 100 रुपये), 12 जीबी रॅम असलेल्या 256 जीबी मॉडेलची किंमत 2499 चीनी युआन (सुमारे 29 हजार 500 रुपये) आणि 16 जीबी रॅमसह 256 जीबी व्हेरिएंटची किंमत 2799 चीनी युआन (सुमारे 33 हजार रुपये) आहे.  या हँडसेटचा आणखी एक प्रकार आहे, ज्यामध्ये 12 जीबी रॅमसह 512 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आले आहे, या मॉडेलची किंमत 2899 चीनी युआन (सुमारे 34 हजार 200 रुपये) आहे. फोनचे तीन कलर स्टार ब्लॅक, इलेक्ट्रॉनिक ब्लू आणि गॅलेक्सी व्हेरिएंट लाँच करण्यात आले आहेत.

टॅग्स :Smartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञान