120Hz रिफ्रेश रेट आणि 2K डिस्प्लेसह iQOO 8 होऊ शकतो लाँच; जबरदस्त फीचर्ससह 4 ऑगस्टला होणार सादर
By सिद्धेश जाधव | Updated: July 29, 2021 17:32 IST2021-07-29T17:30:21+5:302021-07-29T17:32:21+5:30
iQOO 8 Launch: iQOO 8 स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 888 Plus SoC सह येणारआ पहिला स्मार्टफोन असू शकतो.

प्रसिद्ध टिपस्टर डिजिटल चॅट स्टेशनने iQOO 8 स्मार्टफोनच्या बॅटरीची माहिती शेयर केली आहे.
अलीकडेच iQOO ने आपल्या आगामी स्मार्टफोन iQOO 8 ची घोषणा केली होती. कंपनीने सांगितले होते कि 4 ऑगस्टला हा स्मार्टफोन सादर केला जाईल. iQOO 8 स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 888 Plus SoC सह येणारआ पहिला स्मार्टफोन असू शकतो. या iQOO स्मार्टफोनमध्ये 12GB रॅम, 256GB स्टोरेज आणि Android 11 ऑपरेटिंग सिस्टम दिली जाऊ शकते. आता या स्मार्टफोनच्या स्मार्टफोनच्या डिस्प्ले आणि बॅटरी कपॅसिटीची नवीन माहिती समोर आली आहे.
GizmoChina ने आपल्या रिपोर्टमध्ये सांगितले आहे कि iQOO 8 स्मार्टफोनमध्ये LTPO डिस्प्ले पॅनल दिला आहे, हा डिस्प्ले 10-बिट कलर, 2K रिजोल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. तसेच या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 1Hz ते 120Hz दरम्यान कंटेंटनुसार बदलेल. या वेरियेबल रिफ्रेश रेटमुळे स्मार्टफोनची बॅटरी दीर्घकाळ चालेल, अशी चर्चा आहे.
दुसरीकडे प्रसिद्ध टिपस्टर डिजिटल चॅट स्टेशनने iQOO 8 स्मार्टफोनच्या बॅटरीची माहिती शेयर केली आहे. टिप्सटरने सांगितले आहे कि, iQOO 8 मध्ये 4,500mAh ची बॅटरी दिली जाऊ शकते. तसेच ही बॅटरी 120W चार्जिंग स्पीडने चार्ज करता येईल. या स्मार्टफोनमध्ये 160W चार्जिंग स्पीड दिला जाऊ शकतो, असा दावा काही लिक्समध्ये करण्यात आला आहे.