शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
2
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
3
"अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
4
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
5
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
6
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
7
रिपाईला एकही जागा मिळाली नाही, पण मला कॅबिनेट मिळणार - रामदास आठवले
8
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
9
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
10
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
11
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
12
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
13
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
14
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
15
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
16
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
17
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
18
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
19
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
20
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?

iQOO 8 Pro स्मार्टफोनमध्ये मिळणार भन्नाट गिम्बल कॅमेरा; 17 ऑगस्टला होणार सादर 

By सिद्धेश जाधव | Published: August 11, 2021 6:56 PM

iQOO 8 Pro Camera Setup: iQOO 8 Pro कॅमेरा सेटअपमध्ये 50 मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर देण्यात येईल. सोबत एक 48 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड सेन्सर आणि 16 मेगापिक्सलचा तिसरा सेन्सर मिळेल.

ठळक मुद्दे iQOO 8 Pro कॅमेरा सेटअपमध्ये 50 मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर देण्यात येईल. iQOO 8 Pro स्मार्टफोन क्वालकॉमच्या पावरफुल Snapdragon 888+ चिपसेटसह सादर केला जाईल

iQOO ची आगामी फ्लॅगशिप स्मार्टफोन सीरिज 17 ऑगस्टला लाँच करण्यात येणार आहे. या सीरीजमधील iQOO 8 Pro स्मार्टफोनच्या कॅमेऱ्याचा एक पोस्टर कंपनीने सोशल मीडियावर शेयर केला आहे. या पोस्टरमधून या स्मार्टफोनच्या कॅमेरा सेटअपची माहिती मिळाली आहे. iQOO 8 Pro स्मार्टफोन ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह सादर केला जाईल. या सेटअपमधील मुख्य कॅमेरा 50 मेगापिक्सलचा आहे.  

iQOO 8 Pro स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप असेल, हे कंपनीने शेयर केलेल्या पोस्टरमधून समजले आहे. हा कॅमेरा सेटअप VIS 5-अ‍ॅक्सेस अँटी शेक मायक्रो क्लाऊड गिंबल स्टेबलाइजाइजेशन सपोर्टसह सादर केला जाईल. ही विवोची टेक्नॉलॉजी आहे आणि ही याआधी विवोच्या स्मार्टफोन्समध्ये दिसली आहे. यामुळे व्हिडीओ काढताना स्मार्टफोन डगमगला तरीही व्हिडीओ स्थिर रेकॉर्ड केले जातात. तसेच iQOO 8 Pro कॅमेरा सेटअपमध्ये 50 मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर देण्यात येईल. सोबत एक 48 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड सेन्सर आणि 16 मेगापिक्सलचा तिसरा सेन्सर मिळेल, ज्याची फोकल लेंथ 14mm-60mm आहे. 

iQOO 8 स्पेसिफिकेशन्स 

iQOO 8 Pro स्मार्टफोन क्वालकॉमच्या पावरफुल Snapdragon 888+ चिपसेटसह सादर केला जाईल. तसेच iQOO 8 स्मार्टफोनमध्ये Snapdragon 870 किंवा Snapdragon 888 चिपसेट मिळू शकतो. iQOO 8 Pro स्मार्टफोनमध्ये 12GB पर्यंतचा रॅम मिळेल जो रॅम एक्सटेंशन फीचरच्या मदतीने 4GB पर्यंत वाढवता येईल.  

कंपनीने सांगितले आहे कि, आगामी iQOO 8 स्मार्टफोनमध्ये 2K रिजोल्यूशन असलेला डिस्प्ले देण्यात येईल. हा एका E5 AMOLED LTPO 10bit डिस्प्ले पॅनल असेल. हा डिस्प्ले 1Hz ते 120Hz रिफ्रेश रेटमध्ये अ‍ॅडजस्ट होणाऱ्या डायनॅमिक रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. या स्मार्टफोनमध्ये वेगवान Snapdragon 888 Plus SoC देण्यात येईल. या नव्या स्नॅपड्रॅगन चिपसेटसह येणारा हा जगातील पहिला स्मार्टफोन असेल. या फोनमध्ये 120W चार्जिंग टेक्नॉलॉजी देण्यात येईल.   

टॅग्स :VivoविवोSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईड