शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

अरे वा! काही मिनिटांत फुल चार्ज होणार होणार हा स्मार्टफोन; 120W फास्ट चार्जिंगसह आला iQOO 8 5G  

By सिद्धेश जाधव | Updated: August 19, 2021 12:28 IST

iQOO 8 Price: 120W अल्ट्रा फास्ट फ्लॅश चार्जिंग टेक्नॉलॉजीसह आयक्यूने चीनमध्ये iQOO 8 आणि iQOO 8 Pro असे दोन स्मार्टफोन सादर केले आहेत.

ठळक मुद्देआयक्यू 8 चे दोन व्हेरिएंट चिनी बाजारात दाखल झाले आहेत.. यातील ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपमध्ये 48 मेगापिक्सलचा मुख्य Sony IMX598 सेन्सर गिंबल स्टेबिलायजेशनसह देण्यात आला आहे.

iQOO च्या बहुप्रतीक्षित iQOO 8 सीरिजने जागतिक बाजारात पदार्पण केले आहे. या सीरिजमध्ये कंपनीने दोन धमाकेदार फ्लॅगशिप स्मार्टफोन सादर केले आहेत. कंपनीने iQOO 8 आणि iQOO 8 Pro असे दोन स्मार्टफोन सर्वप्रथम चीनमध्ये सादर केला आहेत. हे दोन्ही 120W अल्ट्रा फास्ट फ्लॅश चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करतात. या लेखात आपण सीरिजमधील छोट्या iQOO 8 ची माहिती घेणार आहोत, आयक्यू 8 प्रो बद्दल जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.  (iQOO 8 Launched with Snapdragon 888 and 120W Ultra Fast Flash Charging Technology) 

iQOO 8 चे स्पेसिफिकेशन्स 

आयक्यू 8 स्मार्टफोनमध्ये 6.56-इंचाचा फुलएचडी+ अ‍ॅमोलेड डिस्प्ले मिळतो. 19.8:9 अस्पेक्ट रेशियोसह येणारा हा डिस्प्ले 2376×1080 पिक्सल रिजोल्यूशन आणि 120हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉमचा फ्लॅगशिप 888 चिपसेट देण्यात आणि एड्रेनो 660 जीपीयू देण्यात आला आहे. या आयक्यू फोनमध्ये 12GB पर्यंतचा लेटेस्ट LPDDR5 RAM आणि 256 पर्यंतची वेगवान UFS 3.1 storage देण्यात आली आहे. हा फोन अँड्रॉइड 11 आधारित ओरिजनओएसवर चालतो.  हे देखील वाचा: स्नॅपड्रॅगॉन 888 प्रोसेसर, 12GB रॅमसह पावरफुल Realme GT 5G भारतात लाँच; देणार का शाओमी-वनप्लसला टक्कर?

आयक्यू 8 मधील फोटोग्राफी सेगमेंट देखील तितकाच खास आहे. यातील ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपमध्ये 48 मेगापिक्सलचा मुख्य Sony IMX598 सेन्सर गिंबल स्टेबिलायजेशनसह देण्यात आला आहे. त्याचबरोबे 13 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 13 मेगापिक्सलची पोर्टेट लेन्स देण्यात आली आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळतो. 

iQOO 8 मध्ये सिक्योरिटीसाठी इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. या ड्युअल सिम फोनमध्ये बेसिक कनेक्टिव्हिटीसह 5G SA/NSA आणि Dual 4G VoLTE सपोर्ट देण्यात आला आहे. आयक्यू 8 मधील 4,350एमएएचची बॅटरी 120वॉट अल्ट्रा फास्ट फ्लॅश चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करते. ही टेक्नॉलॉजी काही मिनिटांत हा स्मार्टफोन फुल चार्ज करू शकते.  हे देखील वाचा: 5000mAh बॅटरीसह सॅमसंगचा लो बजेट स्मार्टफोन भारतात सादर; जाणून घ्या Galaxy A03s स्मार्टफोनची किंमत

iQOO 8 ची किंमत 

आयक्यू 8 चे दोन व्हेरिएंट चिनी बाजारात दाखल झाले आहेत. यातील 8GB RAM आणि 128GB storage असलेला व्हेरिएंट 3799 युआन (अंदाजे 43,500 रुपये) मध्ये लाँच झाला आहे. तर 12GB RAM आणि 256GB storage व्हेरिएंट 4199 युआन (अंदाजे 48,00 रुपये) मध्ये विकत घेता येईल.  

टॅग्स :Smartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईड