5000mAh बॅटरीसह सॅमसंगचा लो बजेट स्मार्टफोन भारतात सादर; जाणून घ्या Galaxy A03s स्मार्टफोनची किंमत 

By सिद्धेश जाधव | Published: August 18, 2021 05:26 PM2021-08-18T17:26:36+5:302021-08-18T17:26:43+5:30

Samsung Galaxy A03s: Samsung Galaxy A03s मध्ये कंपनीने ट्रिपल रियर कॅमेरा दिला आहे. कंपनीने हा स्मार्टफोन दोन व्हेरिएंटमध्ये सादर केला आहे.

samsung galaxy a03s launched in india price specs sale offer  | 5000mAh बॅटरीसह सॅमसंगचा लो बजेट स्मार्टफोन भारतात सादर; जाणून घ्या Galaxy A03s स्मार्टफोनची किंमत 

5000mAh बॅटरीसह सॅमसंगचा लो बजेट स्मार्टफोन भारतात सादर; जाणून घ्या Galaxy A03s स्मार्टफोनची किंमत 

Next

Samsung ने आज भारतात आपला नवीन नवीन लो बजेट स्मार्टफोन Galaxy A03s सादर केला आहे. या स्मार्टफोनची चर्चा गेले कित्येक दिवस बातम्या, लिक्स आणि रुमर्समधून सुरु होती. कंपनीने हा स्मार्टफोन दोन व्हेरिएंटमध्ये सादर केला आहे. याची किंमत 11, 499 रुपयांपासून सुरु होते. या सॅमसंग स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक प्रोसेसर देण्यात आला आहे.  

Samsung Galaxy A03s चे स्पेसिफिकेशन्स 

Samsung Galaxy A03s मध्ये कंपनीने 6.5-इंचाचा एचडी+ टीएफटी एलसीडी डिस्प्ले दिला आहे. हा डिस्प्ले 20:9 अस्पेक्ट रेशियो आणि 720x1600 पिक्सल रिजोल्यूशनला सपोर्ट करतो. प्रोसेसिंगसाठी या लो बजेट सॅमसंग फोनमध्ये 2.3गीगाहर्ट्ज ऑक्टकोर प्रोसेसरसह मीडियाटेकचा हीलियो पी35 चिपसेट देण्यात आला आहे. या प्रोसेसरला 4GB पर्यंतच्या रॅम आणि 64GB स्टोरेजची जोड देण्यात आली आहे. ही स्टोरेज 1TB पर्यंत वाढवता येते. हा फोन अँड्रॉइड 11 आधारित वनयुआय 3.1 वर चालतो.  

Samsung Galaxy A03s मध्ये कंपनीने ट्रिपल रियर कॅमेरा दिला आहे. ज्यात एलईडी फ्लॅश, 13 मेगपिक्सलचा मुख्य सेन्सर, 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आणि 2 मेगापिक्सलच्या मॅक्रो लेन्सचा समावेश आहे. या स्मार्टफोनमध्ये 5 मेगापिक्सलचा सेल्फी शुटर मिळतो. बेसिक कनेक्टिव्हिटीसह Samsung Galaxy A03s स्मार्टफोनमध्ये 5,000एमएएचची मोठी बॅटरी देण्यात आली आहे.  

Samsung Galaxy A03s ची किंमत 

सॅमसंग गॅलेक्सी ए03एस स्मार्टफोनचा 3GB रॅम 32GB इंटरल स्टोरेज व्हेरिएंट 11,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच 4GB रॅम आणि 64GB इंटरनल स्टोरेज असलेला मॉडेल कंपनीने 12,499 रुपयांमध्ये बाजारात आणला आहे. हा फोन आजपासून Black, Blue आणि White कलरमध्ये खरेदी करता येईल. 

Web Title: samsung galaxy a03s launched in india price specs sale offer 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.