स्नॅपड्रॅगॉन 888 प्रोसेसर, 12GB रॅमसह पावरफुल Realme GT 5G भारतात लाँच; देणार का शाओमी-वनप्लसला टक्कर?  

By सिद्धेश जाधव | Published: August 18, 2021 02:35 PM2021-08-18T14:35:35+5:302021-08-18T14:40:48+5:30

Realme GT 5G India Price: Realme Book Slim कंपनीचा पहिला लॅपटॉप आहे. जीटी सीरिज याआधी चीनमध्ये देखील सादर करण्यात आली आहे.

Realme gt 5g launch with Snapdragon 888 64mp camera 12gb ram | स्नॅपड्रॅगॉन 888 प्रोसेसर, 12GB रॅमसह पावरफुल Realme GT 5G भारतात लाँच; देणार का शाओमी-वनप्लसला टक्कर?  

स्नॅपड्रॅगॉन 888 प्रोसेसर, 12GB रॅमसह पावरफुल Realme GT 5G भारतात लाँच; देणार का शाओमी-वनप्लसला टक्कर?  

Next
ठळक मुद्देरियलमी जीटी 5जी फोन भारतात दोन व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध होणार आहे.कॅमेऱ्यासाठी Realme GT 5G मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.हा फोन शक्तिशाली क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 888 5G प्रोसेसरसह सादर करण्यात आला आहे.  

रियलमीने आज भारतात Realme GT 5G, Realme GT Master Edition आणि Realme Book Slim असे तीन डिवाइस लाँच केले आहेत. कंपनीने लाँच केलेली जीटी सीरिज कंपनीची फ्लॅगशिप सीरिज आहे, ज्यात दोन 5G स्मार्टफोन लाँच करण्यात आले आहेत. तर Realme Book Slim कंपनीचा पहिला लॅपटॉप आहे. जीटी सीरिज याआधी चीनमध्ये देखील सादर करण्यात आली आहे. या लेखात आपण कंपनीच्या फ्लॅगशिप रियलमी जीटी 5जी च्या स्पेसिफिकेशन्स आणि किंमतीची माहिती घेणार आहोत. हा फोन शक्तिशाली क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 888 5G प्रोसेसरसह सादर करण्यात आला आहे.  

Realme GT चे स्पेसिफिकेशन्स  

Realme GT 5G मध्ये 6.43-इंचाचा FHD+ सुपर अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटवर चालतो. हा डिस्प्ले 360Hz टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो, जो गेमिंगच्या वेळी जास्त उपयुक्त ठरतो. हा डिस्प्ले कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ने प्रोटेक्टेड आहे. फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 888 5G एसओसी आणि Adreno 660 GPU देण्यात आला आहे. या फ्लॅगशिप रियलमी फोनमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी 5G ड्युअल-मोड, 4G LTE, वाय-फाय 6, ब्लूटूथ 5.2, GPS, 3.5 मिमी हेडफोन जॅक आणि USB टाइप- C पोर्ट असे ऑप्शन देण्यात आले आहेत.  

हे देखील वाचा: 18GB रॅम, 6,000mAh बॅटरी आणि स्नॅपड्रॅगन 888+ प्रोसेसरसह दमदार ASUS ROG Phone 5S लाँच

कॅमेऱ्यासाठी Realme GT 5G मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 64 मेगापिक्सलच्या मुख्य सेन्सरसह 8 मेगापिक्सलची वाइड-अँगल लेंस आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आहे. फोनच्या फ्रंटला 16 मेगापिक्सलच्या सेल्फी शुटर देण्यात आला आहे. हा फोन PureRaw मोड, AI सेल्फी, 4K 60fps रेकॉर्डिंगला सपोर्ट करतो. सुरक्षेसाठी फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर मिळतो. तसेच, फोनमध्ये पावर बॅकअपसाठी 65W फास्ट चार्जिंगसह 4,500mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.  

हे देखील वाचा: एकापेक्षा एक पावरफुल स्पेक्ससह iQOO 8 Pro 5G सादर; वेगवान स्नॅपड्रॅगन 888+ चिपसेटसह येणार बाजारात

Realme GT 5G ची भारतातील किंमत  

रियलमी जीटी 5जी फोन भारतात दोन व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध होणार आहे. या फोनचा 8GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज व्हेरिएंट 37,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच 12GB रॅम आणि 256GB इंटरनल स्टोरेज असलेला मॉडेल 41,999 रुपयांमध्ये 25 ऑगस्टपासून फ्लिपकार्ट आणि ऑफलाइन स्टोर्सवरून विकत घेता येईल.  

Web Title: Realme gt 5g launch with Snapdragon 888 64mp camera 12gb ram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.