शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
2
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
3
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
4
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
5
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
6
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
7
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
8
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
9
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
10
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
11
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
12
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
13
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
14
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
15
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
16
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
17
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
18
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
19
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
20
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
Daily Top 2Weekly Top 5

iPhones-iPads युजर्स सावधान!! खबरदारी न घेतल्यास डिव्हाइस होऊ शकतो हॅक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2022 15:21 IST

कोणकोणत्या मॉडेल्सना धोका? खुद्द भारत सरकारने दिला इशारा

CERT-In Apple warning for iPhone iPads: Apple हा एक अतिशय लोकप्रिय ब्रँड आहे. त्यांचे डिव्हाईस बहुतेक देशांमध्ये वापरले जातात. अ‍ॅपलच्या गॅजेट्सची बाजारपेठ भारतातही मोठी आहे. तुम्हीही अ‍ॅपलचे स्मार्टफोन्स म्हणजेच iPhones, टॅब्लेट म्हणजेच iPads वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. आम्ही तुम्हाला iPhones आणि iPads च्या त्या मॉडेल्सबद्दल सांगणार आहोत, ज्याबद्दल भारत सरकारकडून एक इशारा देण्यात आला आहे. सरकारने सांगितले आहे की तुमची ही डिव्हाईस हॅक होण्याची शक्यता खूप जास्त आहे आणि हा धोका टाळण्यासाठी वापरकर्ते काय करू शकतात हे देखील सांगण्यात आले आहे. याविषयी जाणून घेऊया महत्त्वाच्या बाबी-

iPhones-iPadsचे 'हे' मॉडेल्स वापरणारे युजर्स सावधान!

सर्वप्रथम, iPhones आणि iPadsचे कोणते मॉडेल हॅक होण्याचा धोका आहे हे जाणून घेऊया. CERT-In च्या सल्ल्यानुसार, iOS 16.1 आणि 16.0.3 च्या आधीते वर्जन्स आणि iPadOS 16 च्या आधीच्या व्हर्जन्सला धोका आहे. जारी केलेल्या नोट मध्ये या समस्येमुळे प्रभावित झालेल्या उपकरणांची नावे देखील आहेत. या सूचीमध्ये iPhone 8 आणि त्यावरील सर्व मॉडेल्स, iPad Pro ची सर्व मॉडेल्स, iPad Air 3rd Gen आणि त्यावरील, iPad 5th Gen आणि वरील आणि iPad Mini 5th Gen आणि त्यावरील सर्व मॉडेल्सचा समावेश आहे.

सरकारकडून देण्यात आला इशारा

डिव्हाइसेस मध्ये नक्की समस्या काय आहे, हे आता जाणून घ्या. Apple युजर्सना एका नवीन सुरक्षा समस्येबद्दल वॉर्निंग देण्यात आली आहे. Indian Computer Emergency Response Team (CERT-In) ने या धोक्याला 'High Risk' म्हटले आहे. या जोखमीमुळे, हॅकर्स हे डिव्हाइसेस सहज हॅक करू शकतील, म्हणजेच ते डिव्हाइस हॅक करून ताबा मिळवू शकतील आणि नंतर त्याद्वारे आपल्या बँक डिटेल्सही मिळवू शकतील, असा इशारा देण्यात आला आहे. या धोक्याचे वर्गीकरण CVE-2022-42827 असे करण्यात आले आहे.

टॅग्स :Apple iPhone 8अ‍ॅपल आयफोन ८Apple Incअॅपलtechnologyतंत्रज्ञान