iPhone 17 Series: अॅपलने ९ सप्टेंबर रोजी नवीन आयफोन 17 सिरीज लाँच केली. या सिरीजमध्ये iPhone 17, iPhone 17 Pro, iPhone 17 Pro Max तसंच आतापर्यंतचा सर्वात स्लिम iPhone, iPhone 17 Air लाँच केला आहे. आयफोन 16 च्या तुलनेत आयफोन 17 हा जास्त किमतीत सादर करण्यात आला आहे. या फोनची सध्या जगभरात चर्चा सुरू आहे. दरम्यान, आता आयफोन 17 सिरीज लाँच होताच सॅमसंगनेअॅपलची खिल्ली उडवली. सॅमसंगने नुककताच फोल्डेबल सेगमेंट लाँच केले आहेत. तर दुसरीकडे अॅपलने फोल्डेबल फोन लाँच केलेला नाही. आयफोन सिरीज झाल्यानंतर आता सॅमसंगने आयफोनवर टीका केली. पण सॅमसंगने या पोस्टमध्ये कुठेही अॅपलचे नाव घेतलेले नाही. या पोस्टच्या कमेंटमध्ये नेटकऱ्यांनी याचा संदर्भ आयफोनला जोडला आहे.
iPhone 17 Series सिरीजच्या लाँचनंतर, सॅमसंगने २०२२ मध्ये एक्सवर एक पोस्ट केली होती.तिच पोस्ट आता पुन्ही रिपोस्ट केली आहे. २०२२ मध्ये सॅमसंगने 'फोल्डिंग सुरू झाल्यावर आम्हाला सांगा' अशी पोस्ट केली होती.
कोण आहेत अबिदुर चौधरी? ज्यांनी डिझाईन केला Apple चा सर्वात स्लीम iPhone 17 Air
सॅमसंगने २०२२ च्या आधी फोल्डेबल सेगमेंट सुरू केले आहेत. आता कंपनीने २०२२ ची ही पोस्ट पुन्हा शेअर केली. 'विश्वास बसत नाही की ते अजूनही प्रासंगिक आहे.', असं या पोस्टमध्ये म्हटले आहे.
प्रकरण इथेच संपले नाही, सॅमसंगने अॅपलच्या कॅमेरा सिस्टीमवरही निशाणा साधला 48MP x 3 अजूनही 200MP च्या बरोबरीचे नाही" असंही यामध्ये म्हटले होते. याशिवाय, दुसऱ्या एका पोस्टमध्ये, कंपनीने लिहिले की, स्लीप स्कोअरसाठी लोकांना ५ वर्षे वाट पहावी लागली यावर विश्वास बसत नाही.
सोशल मीडियावर अनेकांनी या पोस्टला कमेंट केल्या आहेत. आयफोन प्रेमींनी सॅमसंगला ट्रोल केले आहे. यामध्ये अनेकांनी सॅमसंगने जर व्हिडीओची गुणवत्ता सुधारली तर आयफोनपेक्षा चांगले चालू शकतात अशा कमेंट केल्या आहेत.
अॅपलने आयफोन 17 एअर हा त्यांचा आतापर्यंतचा सर्वात स्लिम हँडसेट म्हणून सादर केला आहे. याची जाडी ५.६ मिलीमीटर आहे. हा आयफोन सॅमसंगच्या गॅलेक्सी S25 एजपेक्षाही पातळ आहे, याची जाडी ५.८ मिलीमीटर आहे. आयफोन 17 एअरची विक्री १९ सप्टेंबरपासून सुरू होईल, या फोनच्या २५६ जीबी व्हेरिएंटची किंमत १,१९,९०० रुपये आहे. या फोनचे अधिक स्टोरेज असलेले ५१२ जीबी आणि १ टीबी पर्याय देखील उपलब्ध आहेत.