Apple चे लेटेस्ट फोन्स म्हणजेच iPhone 17 सीरीज और iPhone Air चा सेल सुरू झाला आहे. लेटेस्ट iPhone खरेदी करण्याची उत्सुकता दरवर्षी पाहायला मिळते. लोक आदल्या रात्रीपासूनच नवीन मॉडेल खरेदी करण्यासाठी Apple स्टोअर्सबाहेर लांबच लांब रांगा लावतात. सकाळी ८ वाजता Apple स्टोअर्स उघडताच लोकांनी नवीन आयफोन घेण्यासाठी मोठी गर्दी केली.
Apple ने त्यांच्या प्रो सीरीजमध्ये कॉस्मिक ऑरेंज कलरचा पर्याय दिला आहे, जो प्री-ऑर्डर दरम्यान आऊट ऑफ स्टॉक झाला. या रंगाला खूप जास्त मागणी आहे. लोक या व्हेरिएंटला भगव्या रंगाशी जोडत आहेत. भारतातही त्याची मोठी मागणी आहे. दिल्लीतील साकेत येथील सिलेक्ट सिटी मॉलमधील Apple स्टोअरमध्ये गेलेल्या एका व्यक्तीने हा फोन खरेदी केल्यानंतर आपला आनंद व्यक्त केला.
"मी सकाळपासून रांगेत होतो आणि या रंगाचा आयफोन खरेदी करण्यास मी उत्सुक होतो. भारतात हा भगवा रंगाचा फोन खूप लोकप्रिय होईल. मी मुस्लिम आहे, पण मला हा रंग खूप आवडतो" असं या व्यक्तीने म्हटलं. Apple दरवर्षी आयफोन्समध्ये नवीन रंग आणतं. यावेळी असाच एक पर्याय म्हणजे कॉस्मिक ऑरेंज, जो लोकप्रिय होत आहे. हा रंग फक्त आयफोन १७ प्रो आणि आयफोन १७ प्रो मॅक्सवर उपलब्ध आहे. याव्यतिरिक्त तुम्हाला सिल्व्हर आणि डीप ब्लू पर्याय देखील मिळतील.
लोकांमध्ये आयफोनची एवढी क्रेझ पाहायला मिळत आहे की ते रात्रीपासूनच रांगेत उभे आहेत. मुंबई, पुणे, बंगळुरू, दिल्ली येथील Apple स्टोअर्सबाहेर पहाटेपासूनच ग्राहकांनी प्रचंड गर्दी केली. पहिल्याच सेलमध्ये आयफोन विकत घेण्याची चढाओढ इतकी वाढली की, मुंबईतील बीकेसी येथील Apple स्टोअरमध्ये काही तरुणांमध्ये तुफान हाणामारी झाली. अखेर त्यांना थांबवण्यासाठी सीआरएफ आणि स्टोअरच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना हस्तक्षेप करावा लागला.