अ‍ॅपल पहिल्यांदाच 'मेड इन इंडिया' iphone 15 विकणार! किंमत कमी होणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2023 05:44 PM2023-09-12T17:44:03+5:302023-09-12T17:45:06+5:30

लाँचच्या दिवशी प्रथमच अ‍ॅपल आयफोनची विक्री करणार आहे

iPhone 15 launch today first time Apple will sell Made-In-India iPhone at launch, will it cost less or not | अ‍ॅपल पहिल्यांदाच 'मेड इन इंडिया' iphone 15 विकणार! किंमत कमी होणार?

अ‍ॅपल पहिल्यांदाच 'मेड इन इंडिया' iphone 15 विकणार! किंमत कमी होणार?

googlenewsNext

iPhone 15 launch today : संपूर्ण जगाला प्रतिक्षा असलेला Apple iPhone 15 आज लाँच होणार आहे. यावेळी 'मेड इन इंडिया' फोन पहिल्यांदाच लोकांच्या हातात येणार आहे. संपूर्ण जग आयफोन 15 लाँच होण्याची आतुरतेने वाट पाहत आहे. भारतातील तंत्रज्ञानप्रेमींनी रात्री 10:30 पर्यंत या गोष्टीची वाट पाहत आहेत. यावेळी Apple iPhone 15 चे लॉन्चिंग भारतीयांसाठी खास आहे, कारण एक मोठा इतिहास लिहिला जाणार आहे. Apple iPhone लाँचच्या दिवशी विकला जाणार असून हा आयफोन 'मेड इन इंडिया' असण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे. Apple iPhone लाँच झाल्यावर त्याची जागतिक विक्रीदेखील आजपासूनच सुरू होणार आहे. यावेळी लॉन्च होताच Apple iPhone 15 दक्षिण आशियाई देशांच्या बाजारपेठेत उपलब्ध होईल. हे फोन 'मेड इन इंडिया' असतील. तथापि, उर्वरित जगात चीनमध्ये बनवलेले iPhone 15 उपलब्ध असतील.

आयफोन 15 भारतात 'असेम्बल' होणार; तामिळनाडूत उत्पादन

भारतात असेंबल केलेला iPhone 15 लॉन्चच्या दिवशी बाजारात उपलब्ध होईल. अशा परिस्थितीत, लॉन्चच्या दिवशीच 'मेड इन इंडिया' iPhone 15 चे दक्षिण आशियाई बाजारपेठांमध्ये येणार असल्याने हे पाहण्यासारखे असणार आहे. केवळ अॅपलच नाही तर जगभरातील अनेक कंपन्या कोरोनानंतर त्यांचे उत्पादन चीनमधून हस्तांतरित करण्यावर भर देत आहेत आणि यासाठी भारत त्यांचे आवडते ठिकाण बनले असल्याचे बोलले दात आहे. iPhone 15 Apple साठी iPhone बनवणारी पुरवठादार कंपनी फॉक्सकॉन टेक्नॉलॉजी ग्रुपने गेल्या महिन्यात तामिळनाडूतील त्यांच्या कारखान्यात Apple iPhone 15 चे उत्पादन सुरू केले आहे.

भारतात iPhone 15 स्वस्तात मिळणार का?

पहिली गोष्ट म्हणजे, आयफोन 15 हा भारतात तयार होणारा पहिला आयफोन नसेल. आयफोनच्या आधीच्या एडिशन्स आयफोन 13 आणि आयफोन 14 देखील 'मेड इन इंडिया' होत्या. तथापि, याचा त्यांच्या किंमतीवर कधीही परिणाम झाला नाही. iPhone 13 चा 128 GB व्हेरिएंट भारतात 79,900 रुपयांना लॉन्च झाला होता. त्याचप्रमाणे, भारतात iPhone 14 चे बेस व्हेरिएंट देखील 79,900 रुपयांच्या किमतीत लॉन्च केले गेले. दोन्ही फोनची यूएस मधील किंमत, लॉन्चच्या वेळी, USD 799 होती. याचा अर्थ असा की मागील दोन्ही आयफोनची भारतातील किंमत फक्त 100 ने गुणाकार केलेली किंमत होती. त्यामुळे याचा फारसा फरक पडेल असे वाटत नसल्याचे बोलले जात आहे.

Web Title: iPhone 15 launch today first time Apple will sell Made-In-India iPhone at launch, will it cost less or not

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.