iPhone Offers: एक्सचेंज ऑफर नव्हे तर थेट 11 हजारांची सूट; iPhone 13 वर अ‍ॅमेझॉन देतंय बंपर डिस्काउंट 

By सिद्धेश जाधव | Published: February 1, 2022 03:36 PM2022-02-01T15:36:36+5:302022-02-01T15:36:47+5:30

iPhone Offers Apple iPhone 13: अ‍ॅमेझॉन इंडियावर आयफोन 13 स्मार्टफोन 5000 रुपयांच्या थेट डिस्काउंटसह उपलब्ध झाला आहे.

iPhone 13 Is Getting Price Cut Of 11000 Rupees On Amazon Know More  | iPhone Offers: एक्सचेंज ऑफर नव्हे तर थेट 11 हजारांची सूट; iPhone 13 वर अ‍ॅमेझॉन देतंय बंपर डिस्काउंट 

iPhone Offers: एक्सचेंज ऑफर नव्हे तर थेट 11 हजारांची सूट; iPhone 13 वर अ‍ॅमेझॉन देतंय बंपर डिस्काउंट 

googlenewsNext

Apple iPhone 13 च्या किंमतीत मोठी कपात झाली आहे. सुमारे 80 हजारांमध्ये मिळणारा हा फोन आता 11 हजार रुपयांपेक्षा जास्त डिस्काउंट दिला जात आहे. विशेष म्हणजे या सवलतीत एक्सचेंज ऑफरचा समावेश नाही. तुम्ही हा लेटेस्ट आयफोन ऑनलाइन शॉपिंग वेबसाईट अ‍ॅमेझॉनवरून स्वस्तात विकत घेऊ शकता. चला जाणून घेऊया नेमकी ऑफर कशी आहे. 

Apple iPhone 13 किंमत आणि ऑफर 

अ‍ॅमेझॉन इंडियावर आयफोन 13 स्मार्टफोन 5000 रुपयांच्या थेट डिस्काउंटसह उपलब्ध झाला आहे. त्यामुळे या मोबाईलचा 128 जीबी व्हेरिएंट 79,900 रुपयांच्या ऐवजी 74,900 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तर 6000 रुपयांची अतिरिक्त सूट मिळवण्यासाठी तुम्ही एसबीआय क्रेडिट कार्ड, आयसीआयसीआय बँक क्रेडिट व डेबिट कार्ड, अमेजॅन पे आयसीआयसीआय क्रेडिट कार्ड आणि कोटक बँक कार्डचा वापर करू शकता. तसेच जुना फोन एक्सचेंज करून 16,650 रुपयांची अतिरिक्त बचत देखील करता येईल.  

Apple iPhone 13 चे स्पेसिफिकेशन्स 

Apple iPhone 13 मध्ये 6.1 इंचाचा रेटिना डिस्प्ले देण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात 12MP चे दोन सेन्सर आहेत. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 12MP चा फ्रंट कॅमेरा देखील देण्यात आली आहे. यात प्रोसेसिंगसाठी कंपनीची A15 बायोनिक चिप देण्यात आली आहे. iPhone 13 मध्ये 128GB स्टोरेज देण्यात आली आहे.   

हे देखील वाचा:

Web Title: iPhone 13 Is Getting Price Cut Of 11000 Rupees On Amazon Know More 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.