शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

5G Network: पुढील १ वर्षात इंटरनेट स्पीड १० पटीनं वाढणार, पण नवा मोबाईल घ्यावा लागणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2022 07:08 IST

इंटरनेट स्पीड लवकरच ४जी तुलनेत १० पट, पुढील महिन्यात ५जी स्पेक्ट्रमच्या लिलावाची प्रक्रिया सुरू

नवी दिल्ली : येत्या काही महिन्यांमध्ये आपल्याला ४ जीच्या तुलनेत दहापट वेगवान असलेले इंटरनेट वापरता येणार आहे. पुढील महिन्यात ५ जी स्पेक्ट्रमच्या लिलावाची  प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. ही सर्व प्रक्रिया वेळेत पार पडली तर सर्वांना ५ जी सेवेचा आनंद घेता येणार आहे. सरकारच्या आदेशानुसार स्पेक्ट्रम खरेदी करणाऱ्या कोणत्याही कंपनीला ६ महिने ते १ वर्षाच्या आत सेवा सुरू करावी लागेल.

अनेक टेलिकॉम ऑपरेटर्सनी त्यांची तयारी पूर्ण केली आहे, त्यामुळे ते स्पेक्ट्रम खरेदी केल्यानंतर ३ ते ६ महिन्यांत सेवा सुरू करू शकतात. जगभरात अनेक देश ५जी नेटवर्क वापरत आहेत. स्पीडटेस्ट इंटेलिजन्सनुसार दक्षिण कोरिया सध्या जगातील सर्वांत वेगवान ५जी सेवा वापरत आहे. त्यांचा वेग ४६२.४८ एमबीपीएस आहे. ४२६.७५ एमबीपीएस स्पीडसह नॉर्वे दुसऱ्या स्थानावर आहे. दुसरीकडे, संयुक्त अरब अमिराती ४०९.९६ एमबीपीएस स्पीडसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.

आपल्या आयुष्यात काय बदल होणार?अपलोड आणि डाउनलोडिंग जलद गतीने केले जाईल.तुम्हाला व्हिडिओ कॉलिंगमध्ये कोणतीही अडचण येणार नाही.स्मार्ट कनेक्टिव्हिटी असलेल्या उपकरणांचा वापर वाढेल.वेगवान वायरलेस इंटरनेट सर्वत्र पोहोचू शकेल, त्यामुळे इंटरनेट कनेक्टिव्हिटी चांगली राहील.घरून काम करणाऱ्यांना नेटवर्कशी संबंधित समस्या येणार नाहीत.ऑनलाइन गेम खेळण्यात कोणतीही अडचण येणार नाही.व्हर्च्युअल रिॲलिटी आणि कारखान्यांमध्ये रोबोट्स वापरणे सोपे होणार आहे.

येथे सर्वात वेगवान ५जी इंटरनेट स्पीड (एमबीपीएस) दक्षिण कोरिया : ४६२ नॉर्वे : ४२६.७५ संयुक्त अरब अमिराती : ४०६.९६ सौदी अरब : ३६६.४६ कतार : ३४०.६२ स्वीडन : ३०५.७२ । चीन : २९९.०४

५जीसाठी मोबाइल बदलावा लागणार५जी नेटवर्क वापरण्यासाठी, तुमच्याकडे ५जी सपोर्ट असलेला मोबाईल असणे आवश्यक आहे. जर तुमच्याकडे ५ जी सपोर्टेड मोबाईल नसेल तर तुम्ही ५जीचा आनंद घेऊ शकणार नाही. ५जी सपोर्टेड मोबाईल घेण्यासाठी तुम्हाला पैसे खर्च करावे लागतील. यासह, ५जीचे टॅरिफ प्लॅनदेखील महाग होऊ शकतात.

टॅग्स :Internetइंटरनेट