शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारने पहिल्याच दिवशी डाव टाकला; मनोज जरांगे बच्चू कडूंच्या शेतकरी लढ्याच्या आंदोलनात सहभागी
2
श्रेयस अय्यरची दुखापत ठरली टीम इंडियासाठी मोठा धक्का, इतके महिने तो राहणार क्रिकेटपासून दूर
3
भयावह! अण्वस्त्रांच्या चाचणी युद्धाला तोंड फुटले; रशियाचे पाहून ट्रम्पनी पेंटागॉनला आदेश दिले...
4
सोन्याच्या वाढलेल्या दरांवर ग्रामपंचायतीने तोडगा काढला! महिलांना केवळ तीनच दागिन्यांची परवानगी, अन्यथा...
5
ऑनर किंलिंग प्रकरणात २० वर्षांची शिक्षा, तुरुंगातून सुटला, आता दोषी आरोपीचा अपघाती मृत्यू
6
तुमच्या पगारात किती महागडे घर खरेदी करावे? तज्ज्ञांनी सांगितले 'हे' ४ महत्त्वाचे नियम; EMI किती असावा?
7
पारंपरिक श्रद्धा, लोककला आणि आधुनिकतेचा संगम; ‘गोंधळ’च्या ट्रेलरने वाढवली उत्सुकता
8
तब्बल ६ वर्षांनंतर भेटले डोनाल्ड ट्रम्प अन् शी जिनपिंग; दक्षिण कोरियात चालली २ तासांची बैठक!
9
गंभीर दुखापतीनंतर श्रेयस अय्यरने पहिल्यांदाच केली सोशल मीडिया पोस्ट, दिली महत्त्वाची माहिती
10
२५ नोव्हेंबरला राम मंदिरात दर्शन बंद राहणार, PM मोदी अयोध्येला जाणार; ८ हजार निमंत्रणे गेली
11
Video - बापरे! ट्रेनमध्ये पर्स चोरीला गेली, महिला संतापली; एसी कोचच्या खिडकीची काच फोडली
12
एक सेल्फी घेतला अन् विषाची बाटली तोंडाला लावली! ३ वर्षांच्या बाळाच्या आई-वडिलांनी का उचललं टोकाचं पाऊल?
13
करदात्यांना मोठा दिलासा! ITR फाईल करण्याची अंतिम मुदत वाढवली; 'ही' आहे नवीन तारीख
14
ट्रम्प यांना मोठा झटका; त्यांच्याच पक्षाचे चार सिनेटर फिरले, कॅनडावरील अतिरिक्त १०% शुल्क लावण्याचा अधिकार काढून घेतला
15
November Astro 2025: नोव्हेंबरची सुरुवात अत्यंत शुभ; आदित्य राजयोगात 'या' ८ राशींचा भाग्योदय
16
IND W vs AUS W Semi Final Live:हीच ती वेळ! कांगारूंची शिकार करत टीम इंडियाच्या वाघीणीं फायनल गाठणार?
17
५ दिवस अशुभाची सावली, पंचक सुरू होणार शुक्रवारी; नेमके काय करावे अन् करू नये? पाहा, ५ नियम
18
बिहारमध्ये मोठा राडा! प्रचाराला आलेल्या तेजप्रताप यादवांवर दगडफेक; तेजस्वींच्या समर्थकांनी हुसकावून लावले
19
"माझ्या मुलीचं काय होईल?" जावयाने पाठवली घटस्फोटाची नोटीस, वडिलांचा हार्ट अटॅकने मृत्यू
20
अमेरिकेतील Rate Cut चा परिणामच नाही... उघडताच शेअर बाजारात मोठी घसरण; 'हे' स्टॉक्स आपटले

देशातील 95 टक्के खेड्यांमध्ये इंटरनेटची सुविधा; गेल्या 10 वर्षांत 70 कोटी मोबाईल युजर्स वाढले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2024 17:34 IST

Internet Connections in India: 'डिजिटल इंडिया' उपक्रमांतर्गत देशातील 95 टक्के खेड्यांमध्ये 3G किंवा 4G इंटरनेट सुविधा उपलब्ध आहे.

Internet Connections in India :केंद्र सरकारच्या 'डिजिटल इंडिया' उपक्रमांतर्गत देशातील 95 टक्के खेड्यांमध्ये 3G किंवा 4G इंटरनेट सुविधा उपलब्ध आहे. केंद्र सरकारने शुक्रवारी संसदेत ही माहिती दिली. केंद्रीय दळणवळण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, भारतात (मार्च 2024) सध्या एकूण 95.44 कोटी इंटरनेट युजर्स आहेत, त्यापैकी 39.83 कोटी ग्रामीण भारतातील आहेत.

मंत्रालयाने पुढे सांगितले की, देशातील एकूण 6,44,131 पैकी 6,12,952 खेड्यांमध्ये (एप्रिल 2024) 3G/4G मोबाईल इंटरनेट सुविधा उपलब्ध आहे. म्हणजेच, देशातील 95.15 टक्के गावांमध्ये इंटरनेट सुविधा आहे. 'डिजिटल इंडिया' उपक्रमांतर्गत, सरकारने मेट्रो, टियर-2 आणि टियर-3 शहरे, तसेच ग्रामीण आणि दुर्गम भागांना जोडण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत.

आकडा 25.15 कोटींवरुन 95.44 कोटी झालामागील एका दशकात देशातील एकूण मोबाइल ग्राहकांची संख्या 25.15 कोटींवरुन 95.44 कोटी झाली आहे. वार्षिक आधारावर 14.26 टक्के CAGR ची वाढ झाली आहे. गेल्या 10 वर्षात देशाच्या कानाकोपऱ्यात दूरसंचार नेटवर्कचा विस्तार करण्यात आल्याचेही सरकारने सांगितले. 

सीमावर्ती भागात मोबाईल टॉवर लावण्याच्या नियमात बदलग्रामीण भागात इंटरनेट ब्रॉडबँड सुविधा देण्यासाठी सरकारने 'भारतनेट' प्रकल्प सुरू केला. देशातील सर्व ग्रामपंचायतींना ऑप्टिकल फायबर केबलने जोडणे, हा त्याचा उद्देश होता. सरकारने सांगितले की 2.2 लाख ग्रामपंचायतींपैकी 2.13 लाख ग्रामपंचायती भारतनेटशी जोडल्या गेल्या आहेत. ऑगस्ट 2022 मध्ये सरकारने सीमावर्ती भागात मोबाईल टॉवर बसवण्याच्या नियमात बदल केला होता, जेणेकरून अधिकाधिक लोकांना मोबाईल इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देता येईल.

टॅग्स :InternetइंटरनेटSmartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञानJioजिओAirtelएअरटेलBSNLबीएसएनएलVodafone Ideaव्होडाफोन आयडिया (व्ही)Central Governmentकेंद्र सरकार