शहरं
Join us  
Trending Stories
1
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
2
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
3
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
4
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
5
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
6
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
7
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
8
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
9
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
10
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
11
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
12
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
13
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
14
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
15
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
16
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
17
‘जन्माधारित नागरिकत्व’चा ट्रम्प यांचा निर्णय कोर्टाकडून स्थगित; अमेरिकेतील भारतीयांना दिलासा
18
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष
19
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
20
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी

इंस्टाग्रामने भारतीय युजर्ससाठी आणली दिवाळी ऑफर, अशाप्रकारे Reels बनवून लाखो रुपये कमवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2022 14:21 IST

Instagram Reels : टिकटॉकला (Tiktok) टक्कर देण्यासाठी कंपनी अधिकाधिक युजर्सना शॉर्ट व्हिडिओंकडे आकर्षित करत आहे. यासाठी कंपनी युजर्सना कमाईची ऑफरही देत ​​आहे.

नवी दिल्ली : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्राम (Instagram) हळूहळू फोटो शेअरिंग ऑप्शनपेक्षा जास्त शॉर्ट व्हिडिओंवर लक्ष केंद्रित करत आहे. गेल्या 2 वर्षात कंपनीने यावर पूर्ण लक्ष केंद्रित केले आहे आणि त्यात अनेक नवीन फीचर्स देखील जोडले गेले आहेत. टिकटॉकला (Tiktok) टक्कर देण्यासाठी कंपनी अधिकाधिक युजर्सना शॉर्ट व्हिडिओंकडे आकर्षित करत आहे. यासाठी कंपनी युजर्सना कमाईची ऑफरही देत ​​आहे. यातच आता कंपनीने दिवाळीच्या खास प्रसंगी अतिरिक्त कमाई करण्याची ऑफर आणली आहे. दरम्यान, कंपनीच्या या ऑफरबद्दल आणि त्याद्वारे तुम्ही अतिरिक्त पैसे कसे कमवू शकता याबद्दल सांगत आहोत.

मेटाने (Meta) भारतात या प्लॅटफॉर्मसाठी Reels Play Bonus ऑफर देखील लाँच केली आहे. या ऑफर अंतर्गत व्हिडिओ बनवणाऱ्या युजर्सना 5000 डॉलरपर्यंत (जवळपास 4 लाख रुपये) बोनस मिळेल. आतापर्यंत ही ऑफर फक्त अमेरिकेत सुरू होती, परंतु आता ती भारतीय क्रिएटर्ससाठी देखील जारी करण्यात आली आहे. या शानदार ऑफरमुळे आता भारतीय कंटेंट क्रिएटर्सजवळ ब्रँड स्पॉन्सरशिप आणि एफिलिएट प्रोग्रामव्यतिरिक्त थेट मेटामधून पैसे कमविण्याची संधी मिळेल. ही ऑफर सादर केल्यानंतर, इंस्टाग्राम आता युजर्स अधिकाधिक रील्स बनवण्यासाठी प्रोत्साहित करत आहे. कंपनीला शॉर्ट व्हिडिओ प्लॅटफॉर्मच्या बाबतीत टिकटॉकला मागे टाकायचे आहे.

ऑफर समजून घ्या...या ऑफरअंतर्गत रील बनवल्यानंतर बोनस त्याच्या नंबर ऑफ प्लेवर अवलंबून असेल. यामध्ये 165M पर्यंत प्लेला काउंट केले जाईल. बोनससाठी 150 पर्यंत रिल्स आवश्यक आहेत. एकदा सुरू केल्यानंतर, युजर्सकडे कमाल बोनससाठी 1 महिन्यापर्यंतचा कालावधी असणार आहे. 11 नोव्हेंबर 2022 पूर्वी बोनस अॅक्टिव्हेट केला जाऊ शकतो. एलिजिबल क्रिएटर्स रील्समधून पैसे कमवू शकतात, जेव्हा त्यांच्या रील्सला गेल्या 30 दिवसांत 1000 व्ह्यू मिळाले आहेत. एकूणच, रील क्रिएटर्सजवळ आता बोनसमध्ये लाखों मिळवण्याची शानदार संधी आहे.

टॅग्स :Instagramइन्स्टाग्राम