शहरं
Join us  
Trending Stories
1
'शक्तिपीठ'च्या मार्गात बदल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अनेक घोषणा म्हणाले, अब आगे बढ़ चुका हूँ मैं... 
2
फुटबॉलचा किंग अन् क्रिकेटचा देव एकाच व्यासपीठावर! वानखेडेवर '१०'ची जादू
3
ऑस्ट्रेलियात दहशतवादी हल्ला, १२ पर्यटक ठार, २९ जखमी; सिडनीतील बाँडी बीचवर बेछूट गोळीबार 
4
कोट्यवधी रुपयांची अफरातफर; भ्रष्टाचार केला म्हणून चीनच्या बँकरला मृत्युदंड
5
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष; सरकार आणि संघटनात्मक अनुभवाची दखल
6
बाइक टॅक्सीचालकाचा तरुणीवर अतिप्रसंग; धैर्याने प्रतिकार करीत गाठले पोलिस ठाणे
7
संपादकीय : महायुतीचा नवा बूस्टर..! नागपूर अधिवेशनात चर्चा, मुनगंटीवारांची सभागृहात तुफान टोलेबाजी
8
नवी मुंबई विमानतळामुळे मुंबईत सकाळच्या वेळी येता येईल का? संध्याकाळी परत जाता येईल का?
9
नवी मुंबई विमानतळावर तिसरीही धावपट्टी! दीर्घकालीन हवाई वाहतुकीचा आढावा; सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया सुरू
10
गोवा अग्निकांड; अपघात नव्हे, अक्षम्य बेपर्वाई! २५ जणांच्या मृत्यूनंतर मालकांचे थायलंडमध्ये पलायन
11
विमा क्षेत्रात १०० टक्के एफडीआय- सर्वांसाठीच बाधक! कोट्यवधी विमाधारकांची गुंतवणूक धोक्यात
12
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
13
अपहरणाचा कट नगर पोलिसांनी उधळला! पुण्याच्या दिशेने जाताना नागापूर पुलावर थरार, दोघांना अटक
14
"मोदी, शाह, राजनाथ, नड्डा...!" भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होताच काय म्हणाले नितीन नवीन?
15
‘लोकमत महागेम्स’मुळे पुन्हा मैदानावर दिसली क्रीडासंस्कृती: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
'मिसेस मुख्यमंत्री' GOAT मेस्सीला भेटल्या, खास PHOTO पोस्ट करून अमृता फडणवीसांनी लिहिले...
17
पंतप्रधान मोदी, रशियाचे पुतिन यांच्या खास मैफलीत झंकारली नागपूरकर लावण्य अंबादे यांची सतार
18
मीरा भाईंदर महापालिका, परिवहन ठेकेदाराच्या वादात बससेवा डबघाईला; सामान्य नागरिकांना मनस्ताप
19
महिनाभर आधी झालेलं प्रेयसीचं लग्न, पहिल्या प्रियकराने नवऱ्याला भेटायला बोलवलं अन् संपवलं...
20
VIDEO: आधी गणपती बाप्पाचा जयजयकार, नंतर CM देवेंद्र फडणवीसांनी मेस्सीला केलं एक 'प्रॉमिस'
Daily Top 2Weekly Top 5

Instagram वर कमी लाईक्स येतात? नवं फीचर करेल मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2019 16:03 IST

इन्स्टाग्राम युजर्ससाठी आता एक खूशखबर आहे कारण इन्स्टाग्राम लाईक्स लपवण्यासाठी एका नव्या फीचरवर सध्या काम करत आहे. 

ठळक मुद्देइन्स्टाग्राम युजर्ससाठी आता एक खूशखबर आहे कारण इन्स्टाग्राम लाईक्स लपवण्यासाठी एका नव्या फीचरवर सध्या काम करत आहे. युजर्समध्ये अनेकदा लाईक्सवरून स्पर्धा सुरू असते. ही स्पर्धा कमी करण्यासाठी इन्स्टाग्रामने हे महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे.नव्या फीचरचा सर्व युजर्सना फायदा होणार आहे. युजर्स मनात कोणत्याही प्रकारचा संकोच न ठेवता यामुळे बिनधास्त पोस्ट करू शकतात.

नवी दिल्ली - सोशल मीडियात फोटोंच्या दुनियेतून वर्चस्व गाजवणारं इन्स्टाग्राम आपल्या युजर्ससाठी नवनवीन फीचर्स घेऊन येत असतं. इन्स्टावर आपल्या पोस्टना अथवा फोटोला किती लाईक मिळतात हे युजर्सच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं असतं. मात्र काही जणांच्या पोस्टला खूपच कमी लाईक्स मिळतात. अशा इन्स्टाग्राम युजर्ससाठी आता एक खूशखबर आहे कारण इन्स्टाग्राम लाईक्स लपवण्यासाठी एका नव्या फीचरवर सध्या काम करत आहे. 

टेकक्रंचने दिलेल्या रिपोर्टनुसार, युजर्समध्ये अनेकदा लाईक्सवरून स्पर्धा सुरू असते. ही स्पर्धा कमी करण्यासाठी इन्स्टाग्रामने हे महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे. अनेकदा आपल्या प्रतिस्पर्धी युजर्सचे लाईक अधिक असल्यास त्याच्याबाबत द्वेष निर्माण होतो. तर काही जण कमी लाईक्स मिळतील म्हणून पोस्ट न करण्याचा विचार करतात. त्यामुळे या नव्या फीचरचा सर्व युजर्सना फायदा होणार आहे. युजर्स मनात कोणत्याही प्रकारचा संकोच न ठेवता यामुळे बिनधास्त पोस्ट करू शकतात. इन्स्टाग्रामच्या प्रवक्यांनी रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, इन्स्टाग्राम अशाप्रकारचं फीचर आणण्यासाठी विचार करत होतं. सध्या या फीचरची चाचणी सुरू आहे. 

Instagram वर आता व्हिडीओ रिवाइंड करता येणारइन्स्टाग्राम एक नवीन फीचर आणणार असून या फीचरच्या मदतीने व्हिडीओ आता रिवाइंड करणे शक्य होणार आहे. इन्स्टाग्राम apk फाइलमध्ये @wongmjane च्या डेवलपरने याबाबत माहिती दिली आहे. इन्स्टाग्राम व्हिडीओ सीक बारची चाचणी घेत आहे. तसेच एखाद्या व्हिडीओच्या सीक बारवर क्लिक करून कोणत्याही सेकंदावर घेऊन जाऊन तो व्हिडीओ पाहता येणार आहे. मात्र इन्स्टाग्रामच्या या नव्या फीचरचा फटका हा काही युजर्सना बसणार आहे. कारण आधी रिवाइंडचा पर्याय उपलब्ध नसल्याने युजर्स एका व्हिडीओवर बराच वेळ थांबून राहत होते. मात्र आता या फीचर नंतर ते इन्स्टा युजर्स फक्त आपल्याला हवा असलेला व्हिडीओचा भाग ड्रॅग करून पाहू शकतात. इन्स्टाग्रामचं व्हिडीओ रिवाइंडचे हे फीचर लवकरच येणार असल्याची माहिती मिळत आहे. 

आता इन्स्टाग्रामवर सुद्धा करा शॉपिंग, नवीन फीचर लाँच! 

सोशल मीडियात लोकप्रिय असणारे इन्स्टग्राम आता ई-कॉमर्समध्ये उतरले आहे. कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी इन्स्टाग्रामवर निवडक ब्रँडच्या उत्पादनाची खरेदी करण्याची सुविधा आणली आहे. अमेरिकेत प्रायोगिक तत्वावर याची सुरुवात करण्यात आली आहे. इन्स्टाग्राम अ‍ॅपमध्ये नवीन फीचर आणले आहे. या फीचरच्या माध्यमातून ग्राहकांना खरेदीची सुविधा देण्यात आली आहे. इन्स्टाग्राम फेसबुकचीच एक कंपनी आहे. या कंपनीने एक ऑनलाइन पोस्ट केली आहे. यामध्ये म्हटले आहे की, 'आम्ही इन्स्टाग्रामवर उत्पादने खरेदी करण्याची सुविधा देत आहेत. जर तुम्हाला काही उत्पादने आवडली असतील, तर इन्स्टाग्राम अ‍ॅपच्या माध्यमातून खरेदी करु शकता.' याचबरोबर, इन्स्टाग्राम अ‍ॅपमध्ये चेकआऊट बटनवर क्लिक केल्यानंतर उत्पादनांची संपूर्ण माहिती ग्राहकांना मिळणार आहे. यामधून ग्राहक आपल्या आवडीची उत्पादने खरेदी करु शकतात, असे कंपनीने म्हटले आहे. 

इन्स्टाग्रामने आणलं नवं फीचर, अश्लील फोटो ब्लर ठेवणार

इन्स्टाग्रामने आपल्या युजर्ससाठी एक नवीन फीचर आणले आहे. सेन्सिटिव्ह स्क्रीन असं या नव्या फीचरचं नाव असून इन्स्टाने हे फीचर लॉन्च केले आहे. या फीचरमुळे अश्लील फोटो, व्हिडीओ, थंबनेल्स युजर्सने क्लिक करेपर्यंत ब्लर दिसणार आहेत. वोग डॉट को डॉट यूकेच्या अहवालानुसार, भारतात इन्स्टाग्राम वापरणाऱ्या ग्राहकांसाठी हे फीचर आहे. अश्लील, वादग्रस्त कमेंट्सला आळा घालण्यासाठी इन्स्टाग्रामने हे पाऊल उचललं आहे. अल्पवयीन मुला-मुलींना नुकसान पोहचू नये यासाठी हे फीचर उपयोगी ठरणार आहे.

 

टॅग्स :Instagramइन्स्टाग्रामtechnologyतंत्रज्ञान