Instagram ने लाँच केले Diwali-Special Stickers आणि स्टोरी फीचर; असे येणार वापरता 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2021 06:44 PM2021-11-01T18:44:31+5:302021-11-01T18:44:53+5:30

Instagram ने दिवाळी स्पेशल स्टिकर आणि स्टोरी फीचर लाँच केले आहे. या लेखातील स्टेप्स फॉलो करून तुम्ही मित्र-मत्रिणींना दिवाळीच्या शुभेच्छा पाठवू शकता.  

Instagram launches diwali special stickers and story feature know here how to use it  | Instagram ने लाँच केले Diwali-Special Stickers आणि स्टोरी फीचर; असे येणार वापरता 

Instagram ने लाँच केले Diwali-Special Stickers आणि स्टोरी फीचर; असे येणार वापरता 

googlenewsNext

Instagram ने युजर्ससाठी Diwali 2021 च्या निमित्ताने 3 नवीन स्टिकर लाँच केले आहेत. युजर्स या स्टिकर्सचा वापर करून आपल्या मित्र-मैत्रिणींना दिवाळीच्या शुभेच्छा देऊ शकतात. या स्टिकरचा वापर करून स्टोरीज पोस्ट केल्यास त्यांच्या फॉलोअर्सना Diwali Special Multi Author स्टोरीमध्ये देखील दिसतील.  

Instagram च्या #ShareYourLight या दिवाळीच्या ग्लोबल कँपेनमधील हे स्टिकर्स बंगळुरूमधील चित्रकार आणि पॅटर्न डिजाइनर Neethi (@kneethee) यांनी बनवले आहेत. तुम्ही पुढे दिलेल्या स्टेप्स फॉलो करून Instagram चे हे नवीन स्टिकर्स आणि स्टोरी फीचर वापरू शकता.  

Instagram चे हे नवीन दिवाळी स्टिकर वापरण्यासाठी  

  • यासाठी तुम्हाला सर्वप्रथम इन्स्टाग्रामवर जाऊन तुमच्या स्टोरीजसाठी कटेंट अपलोड करावा लागेल.  
  • त्यानंतर वर दिलेल्या Navigation बारवर जाऊन स्टिकर टूलवर क्लिक करा. 
  • फीचर सेक्शन अंतगर्त तुम्हाला 3 नवीन दिवाळी थीममधील स्टिकर्स मिळतील. ते तुमच्या स्टोरीमध्ये अ‍ॅड करा. 
  • हे स्टिकर्स 1 नोव्हेंबर रात्रीपासून उपलब्ध होईल. तर, Multi-Author स्टोरी फीचर 2 नोव्हेंबरपासून येईल. 

तसेच आता Facebook Messenger आणि Instagram दरम्यान कॉन्टॅक्ट एक्सपोर्ट करण्याचे फिचर देण्यात आले आहे. त्यामुळे युजर फेसबुक मेसेंजरवरून इंस्टाग्राम युजर आणि इंस्टाग्रामवरून फेसबुक युजरशी गप्पा मारू शकतात.  

Web Title: Instagram launches diwali special stickers and story feature know here how to use it 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.