जर तुम्ही दिवसभर इन्स्टाग्रामवर अनेक स्टोरी पोस्ट करत असाल आणि तुम्हाला वाटत असेल की यामुळे तुमचा रीच कमी होत आहे, तर तुमच्यासाठी आता एक आनंदाची बातमी आहे. इन्स्टाग्रामने अधिकृतपणे स्पष्ट केलं आहे की, त्यांनी तो बगचे ठीक केला आहे ज्यामुळे अधिक स्टोरी पोस्ट करणाऱ्या युजर्सना पोहोच कमी होत होती.
इन्स्टाग्रामचे हेड एडम मोसेरी यांनी एका व्हिडिओद्वारे सांगितलं की, युजर्स सतत तक्रार करत होते. एका दिवसात अधिक स्टोरी पोस्ट केल्यानंतर त्यांचा रीच कमी होतो. त्यांनी सांगितलं की, हे जाणूनबुजून केलेलं पाऊल नव्हतं तर तांत्रिक बिघाड होता. आता ते दुरुस्त करण्यात आलं आहे आणि तुम्ही तुम्हाला पाहिजे तितक्या स्टोरी पोस्ट केल्यास तुमचा रीच मर्यादित राहणार नाही.
मोसेरी यांनी असंही स्पष्ट केलं की, बग काढून टाकल्याने तुमचे सर्व फॉलोअर्स प्रत्येक स्टोरी पाहतील असा अर्थ नाही. जर एखादा युजर खूप जास्त स्टोरी पोस्ट करत असेल तर कधीकधी फॉलोअर्स थकून त्या स्किप करू शकतात. म्हणजेच ते तुमच्या कंटेंटवर आणि फॉलोअर्सच्या आवडीवर देखील अवलंबून असेल.
थ्रेड्सवरील एका युजरने असा दावा केला आहे की, हा बग जवळपास सहा महिन्यांपासून क्रिएटर्सना त्रास देत होता. याचा अर्थ असा की, या काळात कोट्यवधी युजरसच्या स्टोरीचा पोहोच अनवधानाने कमी होत होती, ज्यामुळे व्ह्यूजच्या संख्येवरही मोठा परिणाम झाला. विशेषतः ब्रँड डील आणि प्रमोशनद्वारे कमाई करणाऱ्या क्रिएटर्सना त्रास सहन करावा लागला.
इन्स्टाग्राम व्ह्यूजसाठी थेट पैसे देत नाही. उलट क्रिएटर्स स्पॉन्सरशिप, ब्रँड कोलॅबरेशन, प्रोडक्ट प्रमोशन आणि एफिलिएट मार्केटिंग सारख्या पद्धतींद्वारे कमाई करतात. अशा परिस्थितीत स्टोरीचा रीच कमी झाल्यामुळे त्यांच्या कमाईवर थेट परिणाम झाला.
गेल्या काही महिन्यांत इन्स्टाग्रामने अनेक नवीन फीचर्स सादर केली आहेत. कंपनीने जवळजवळ एक दशकानंतर आयपॅडसाठी एप लाँच केलं आहे आणि YouTube सारख्या पिक्चर-इन-पिक्चर मोडवर देखील काम करत आहे, ज्याद्वारे रील फ्लोटिंग विंडोमध्ये पाहता येतात.