शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

Windows 11 सपोर्ट आणि इंटेल प्रोसेसर असलेला Infinix चा जबरदस्त लॅपटॉप येतोय भारतात  

By सिद्धेश जाधव | Published: November 23, 2021 6:32 PM

Infinix Inbook X1 Laptop: Infinix Inbook X1 Laptop लवकरच भारतात पदार्पण करू शकतो. हा लॅपटॉप Windows 11 ऑपरेटिंग सिस्टमसह येणारा कंपनीचा पहिला लॅपटॉप असेल.

Infinix आपल्या बजेट फ्रेंडली स्मार्टफोन्ससाठी ओळखली जाते. परंतु लवकरच कंपनी लॅपटॉप सेगमेंटमध्ये देखील आपला हात अजमावणार आहे. याची सुरुवात कंपनी नवीन लॅपटॉप Infinix Inbook X1 पासून करणार आहे. हा लॅपटॉप लवकरच भारतात सादर केला जाऊ शकतो. यात लेटेस्ट Windows 11 सपोर्ट देण्यात येईल. तसेच हा नवीन लॅपटॉप हलका, मेटल बॉडी आणि Intel Core i3, Core i5 आणि Core i7 प्रोसेसरसह बाजारात येईल.  

Infinix Inbook X1 

Infinix Inbook X1 हा कंपनीचा पहिला लॅपटॉप असेल जो Windows 11 ओएससह सादर केला जाईल. या लॅपटॉपमध्ये Intel Core i3, Core i5 आणि Core i7 असे प्रोसेसरचे ऑप्शन मिळतील. कंपनीने सांगितले आहे कि या लॅपटॉपचे वजन 1.48 किलोग्राम  आणि थिकनेस 16.3mm असेल. हा डिवाइस एयरक्राफ्ट ग्रेड अ‍ॅल्युमिनियम फिनिशसह सादर केला जाईल.  

इनफिनिक्सच्या आगामी लॅपटॉपमध्ये 55Whr ची बॅटरी देण्यात येईल. ही बॅटरी 13 तासांचा प्ले बॅक टाईम देईल, असे कंपनीने सांगितले आहे. हा डिवाइस फ्लिपकार्टवर खरेदीसाठी उपलब्ध होईल. या लॅपटॉपचे ऑरोरा ग्रीन, नोबल रेड आणि स्टारफॉल ग्रे असे तीन कलर व्हेरिएंट खरेदीसाठी उपलब्ध होतील. Infinix Inbook X1 मध्ये याआधी आलेल्या Inbook X1 Pro सारखे बरेचशे फीचर्स मिळू शकतात.  

Infinix Inbook X1 Pro 

Infinix Inbook X1 Pro मध्ये 1920x1080 पिक्सल रेजॉलूशन असलेला 14 इंचाचा IPS LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. जो 300 नीटस पीक ब्राईटनेस आणि 178 डिग्री व्यूइंग अँगलला सपोर्ट करतो. या प्रो व्हेरिएंटमधील 55 Whr ची बॅटरी 65W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. चार्जिंगसाठी यात यूएसबी टाईप-C पोर्ट मिळतो. कनेक्टिविटीसाठी या लॅपटॉपमध्ये यूएसबी टाइप-C पोर्ट, दोन यूएसबी 3.0 पोर्ट, एक यूएसबी 2.0 पोर्ट, एक HDMI पोर्ट, एक 3.5mm जॅक आणि एसडी कार्ड रीडर देण्यात आला आहे. 

टॅग्स :laptopलॅपटॉपtechnologyतंत्रज्ञान