शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

अ‍ॅप डाऊनलोड करण्यात भारत दुसर्‍या क्रमांकावर !

By शेखर पाटील | Updated: January 22, 2018 18:56 IST

जगभरात स्मार्टफोन अ‍ॅप वापरण्याच्या प्रमाणात वाढ होत असतांना भारतीयांनाही याची भुरळ पडली असून जगात आपण अ‍ॅप डाऊनलोड करण्याबाबत दुसर्‍या क्रमांकावर असल्याचे एका अहवालातून अधोरेखित झाले आहे.

स्मार्टफोन अ‍ॅप्लीकेशन्सच्या वापरावर लक्ष ठेवून याचे विश्‍लेषण करण्यासाठी ख्यात असणार्‍या अ‍ॅप अ‍ॅनी या संस्थेने २०१७ मध्ये जागतिक पातळीवर अ‍ॅप वापराबाबतचा सविस्तर अहवाल नुकताच सादर केला आहे. २०१७च्या अखेरीस जगभरात १७५ अब्जांपेक्षा जास्त अ‍ॅप्स डाऊनलोड करण्यात आले आहेत.  यातील सर्वात लक्षणीय बाब म्हणजे अ‍ॅप डाऊनलोड करण्यात भारतीयांनी अमेरिकन युजर्सला मागे टाकत दुसरा क्रमांक पटकावला आहे. तर या यादीत चीन देश पहिल्या क्रमांकावर आहे. जगात गेल्या वर्षी अ‍ॅप्लीकेशन्सचा वापर ५० टक्क्यांनी वाढला असला तरी भारतात हेच प्रमाण तब्बल २२५ टक्के इतके असल्याचे या अहवालात दर्शविण्यात आले आहे. याचाच अर्थ असा की, जगातील अन्य देशांच्या तुलनेत भारतीयांमध्ये अ‍ॅपचा वापर प्रचंड प्रमाणात वाढला आहे. यामागे अनेक कारणे आहेत. एक तर नोटाबंदीनंतरच्या कालखंडात केंद्र सरकारने युपीआयवर आधारित डिजीटल पेमेंट प्रणालीचा प्रचार मोठ्या प्रमाणात केला. यामुळे विविध अ‍ॅपचा वापर वाढला. तर दुसरीकडे मोबाईल उत्पादक कंपन्यांनी अनेक उत्तमोत्तम हँडसेट अत्यंत किफायतशीर दरात सादर करण्याचा सपाटा लावला आहे. रिलायन्स जिओने तर अगदी चकटफू जिओफोन सादर करत धमाल केली. याचाच कित्ता अन्य कंपन्यांनीही गिरवत अल्प मूल्यात हँडसेट सादर केले आहेत. याच्या जोडीला सेल्युलर कंपन्यांनी अत्यंत किफायतशीर दरात डाटा प्लॅन्स सादर केल्यामुळे स्मार्टफोन्सचा आणि पर्यायाने अ‍ॅप्लीकेशन्सचा वापर वाढला आहे.

अ‍ॅप अ‍ॅनीच्या अहवालानुसार प्रत्येक भारतीय युजरकडे सरासरी ८० अ‍ॅप असून यातील निम्मे म्हणजे ४० अ‍ॅप ते सातत्याने वापरत असतात. चीन आणि जपानमध्ये यापेक्षा जास्त म्हणजेच सरासरी १०० अ‍ॅप वापरात असल्याचे या अहवालात सांगण्यात आले आहे. मात्र एकंदरीत संख्येचा विचार केला असता अ‍ॅप डाऊलोड करण्यात भारताचा क्रमांक आता चीननंतर लागत असून अमेरिका तिसर्‍या क्रमांकावर फेकला गेला आहे. तथापि, अ‍ॅप वापराचा विचार केला असता भारत इतर देशांच्या खूप मागे आहे. भारताचा या यादीत ३०वा क्रमांक लागतो. भारतातील टॉप-१० अ‍ॅपमध्ये व्हाटसअ‍ॅप, फेसबुक, फेसबुक मॅसेंजर, ट्रुकॉलर, शेअरइट, एमएक्स प्लेअर, युसी ब्राऊजर, अमेझॉन, पेटीएम आणि इन्स्टाग्राम आदींचा समावेश आहे. यातील पेटीएम हे एकमेव भारतीय अ‍ॅप असल्याची बाब लक्षणीय आहे. तर उर्वरित अन्य ९ अ‍ॅप्स हे विदेशी आहेत.