अॅपल कंपनीची बहुप्रतिक्षित आयफोन १७ सिरीज अखेर लॉन्च झाली. अॅपलने आपल्या इव्हेंटमध्ये आयफोन १७, आयफोन १७ प्रो, आयफोन १७ प्रो मॅक्स, आणि आयफोन १७ एअर असे चार मॉडेल्स लॉन्च केले आणि त्यांच्या किंमतीही जाहीर केल्या. भारतात आयफोन १७ च्या बेस मॉडेलची किंमत ८२ हजार ९०० रुपयांत उपलब्ध आहे. भारतातील अनेक लोक ऑनलाइन किंवा परदेशातून आयफोन मागवतात. कारण वेगवेगळ्या देशांमध्ये आयफोनच्या किमती कमी-जास्त असतात. त्यामुळे कोणत्या देशात आयफोन सर्वात स्वस्त मिळतोय, हे जाणून घेऊयात.
भारत:आयफोन १७ भारतात ८२ हजार ९०० रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लॉन्च करण्यात आला. आयफोन एअरच्या २५६ जीबी व्हेरिएंटची किंमत १ लाख १९ हजार ९०० रुपये, आयफोन १७ प्रोच्या २५६ जीबी व्हेरिएंटची किंमत १ लाख ३४ हजार ९०० रुपये, तर आयफोन १७ प्रो मॅक्सच्या २५६ जीबी व्हेरिएंटची किंमत १ लाख ४९ हजार ९०० रुपये आहे.
अमेरिका:आयफोन १७ ची अमेरिकेतील किंमत ७९९ डॉलर आहे, जी भारतीय चलनात सुमारे ७० हजार ५८० रुपये असेल. यासोबतच, आयफोन १७ एअर ९९९ डॉलर म्हणजेच सुमारे ८८ हजार १६० रुपयांना खरेदी करता येईल. आयफोन १७ प्रो $१०९९ म्हणजेच सुमारे ९६ हजार ९८० रुपयांना खरेदी करता येईल आणि आयफोन १७ प्रो मॅक्स $१,१९९ म्हणजेच सुमारे १ लाख ०५ हजार ८०१० रुपयांना खरेदी करता येईल.
दुबई:आयफोन १७ दुबईमध्ये ३,३९९ दिरहममध्ये लॉन्च करण्यात आला आहे, जो भारतीय रुपयांमध्ये सुमारे ८१ हजार ६४० रुपये आहे. आयफोन एअर तेथे ४,२९९ दिरहममध्ये म्हणजेच सुमारे १ लाख ०३ हजार २६० रुपयांना, आयफोन प्रो मॉडेल ४,६९९ दिरहममध्ये म्हणजेच सुमारे १ लाख १२ हजार ८६० रुपयांना आणि आयफोन प्रो मॅक्स ५,०९९ दिरहममध्ये म्हणजेच सुमारे १ लाख २२ हजार ४७१ रुपयांना खरेदी करता येईल.
ऑस्ट्रेलिया:ऑस्ट्रेलियामध्ये आयफोन १७ हा १,३९९ ऑस्ट्रेलियन डॉलर्स म्हणजेच सुमारे ८१ हजार २८० रुपयांना लॉन्च करण्यात आला आहे. तिथे आयफोन १७ एअर १,७९९ अस्ट्रेलियन डॉलर्स म्हणजेच सुमारे १ लाख ०४ हजार ५२५ रुपयांना, आयफोन १७ प्रो १,९९९ अस्ट्रेलियन डॉलर्स म्हणजेच सुमारे १ लाख १६ हजार १४५ रुपयांना आणि आयफोन १७ प्रो मॅक्स २,१९९ अस्ट्रेलियन डॉलर्स म्हणजेच सुमारे १ लाख २७ हजार ७६५ रुपयांना खरेदी करता येईल.
कॅनडा:कॅनडामध्ये आयफोन १७ $११२९ म्हणजेच सुमारे ७६ लाख ३९५ रुपयांना लॉन्च करण्यात आला आहे. कॅनडामध्ये, आयफोन १७ एअर $१४४९ म्हणजेच सुमारे ९२ लाख ३२५ रुपयांना, आयफोन १७ प्रो $१५९९ म्हणजेच सुमारे १ लाख ०१ हजार ८८२ रुपयांना आणि आयफोन १७ प्रो मॅक्स $१७४९ म्हणजेच सुमारे १ लाख ११ हजार ४३९ रुपयांना खरेदी करता येईल.
इंग्लंड:युकेमध्ये आयफोन १७ ला ७९९ पौंडच्या सुरुवातीच्या किमतीत लॉन्च करण्यात आला आहे, जो भारतीय चलनात सुमारे ९५ हजार ३४० रुपयांच्या समतुल्य आहे. तिथे, आयफोन एअर £९९९ म्हणजेच सुमारे १ लाख १९ हजार २०२ रुपयांना, आयफोन १७ प्रो £१,०९९ म्हणजेच सुमारे १ लाख ३१ हजार १३५ रुपयांना आणि आयफोन १७ प्रो मॅक्स £१,१९९ म्हणजेच सुमारे १ लाख ४३ हजार ०७० रुपयांना खरेदी करता येईल.