वाढीव रॅम आणि स्टोअरेजयुक्त सॅमसंग गॅलेक्सी जे 7 नेक्स्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 08:41 AM2017-12-25T08:41:00+5:302017-12-25T08:41:31+5:30

सॅमसंग कंपनीने आपल्या गॅलेक्सी जे 7 नेक्स्ट या मॉडेलची वाढीव रॅम आणि स्टोअरेजयुक्त आवृत्ती सादर केली आहे.

Increased RAM and storage, Samsung Galaxy J7 Next | वाढीव रॅम आणि स्टोअरेजयुक्त सॅमसंग गॅलेक्सी जे 7 नेक्स्ट

वाढीव रॅम आणि स्टोअरेजयुक्त सॅमसंग गॅलेक्सी जे 7 नेक्स्ट

googlenewsNext

सॅमसंग कंपनीने जुलै महिन्याच्या शेवटी आपले सॅमसंग गॅलेक्सी जे 7 नेक्स्ट हे मॉडेल भारतीय बाजारपेठेत 11 हजार 490 रूपये मूल्यात सादर केले होते. हा स्मार्टफोन 2 जीबी रॅम आणि 16 जीबी इनबिल्ट स्टोअरेजने युक्त होता. यातील रॅम आणि स्टोअरेज वाढवत, तसेच डिस्प्लेचा आकार थोड्या प्रमाणात वाढवून सॅमसंग गॅलेक्सी जे 7 नेक्स्ट या मॉडेलची नवीन आवृत्ती 12 हजार 990 रूपयात लाँच केली आहे. हा स्मार्टफोन काळा आणि सोनेरी या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये सादर करण्यात आला असून ग्राहकांना हे मॉडेल देशभरातील शॉपीजमधून खरेदी करता येईल.

सॅमसंग गॅलेक्सी जे 7 नेक्स्ट या स्मार्टफोनमध्ये 5.5 इंच आकारमानाचा आणि एचडी म्हणजेच 1280 बाय 720 पिक्सल्स क्षमतेचा सुपर अमोलेड डिस्प्ले असेल. याची रॅम 3 जीबी आणि स्टोअरेज 32 जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने 256 जीबीपर्यंत वाढविता येणार आहे. यातील मुख्य कॅमेरा 13 मेगापिक्सल्सचा तर फ्रंट कॅमेरा 5 मेगापिक्सल्स क्षमतेचा असेल. सॅमसंग गॅलेक्सी जे 7 नेक्स्ट या मॉडेलमध्ये फोर-जी एलटीई नेटवर्क कनेक्टिव्हिटीसह वाय-फाय, ब्ल्यू-टुथ, जीपीएस, मायक्रो-युएसबी आदी फिचर्स प्रदान करण्यात आले आहेत. तर यातील बॅटरी 3000 मिलीअँपिअर क्षमतेची आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या नोगट या आवृत्तीवर चालणारा आहे.

Web Title: Increased RAM and storage, Samsung Galaxy J7 Next

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.