शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Income from YouTube Trick: असेल हरी...! काहीच न करता युट्यूबवर लाखो रुपये कमवताहेत लोक; ही ट्रीक येतेय कामी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2022 17:34 IST

Income from YouTube Trick: सुरुवातीला लोकांना ओरिजिनल कंटेंट टाकावा लागत होता. त्यासाठी त्यांना तासंतास डोके लढवावे लागत होते, कष्ट करावे लागत होते, तसेच पैसेही खर्च करावे लागायचे. परंतू आता लोकांच्या हाती एक भन्नाट ट्रीक सापडली आहे.

आजकाल युट्यूबवर लोक काही ना काही व्हिडीओ टाकून लाखो रुपये कमवत आहेत. एका युट्यूबरने तर काल तो सात मिनिटांसाठी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनला होता, असा दावा केला आहे. परंतू यासाठी या लोकांना युट्यूबवर काही ना काही बनवून व्हिडीओ पोस्ट करावे लागतात, त्यातून सबस्क्रायबर्स मिळवायचे आणि व्ह्यूव्हज आले की पैसे मिळतात. परंतू अशी एक ट्रीक आहे ज्यामुळे तुम्ही तुमच्या कॅमेराने व्हिडीओ बनविण्याचे कष्ट न घेताही लाखोंची कमाई करू शकता. 

सुरुवातीला लोकांना ओरिजिनल कंटेंट टाकावा लागत होता. त्यासाठी त्यांना तासंतास डोके लढवावे लागत होते, कष्ट करावे लागत होते, तसेच पैसेही खर्च करावे लागायचे. परंतू आता लोकांच्या हाती एक भन्नाट ट्रीक सापडली आहे. यामुळे पैसेही खर्च करावे लागत नाहीत की बाहेर राब राब राबावे लागत नाही, आपोआप पैसे अकाऊंटमध्ये येऊ लागतात. अशा प्रकारे पैसे कमविणारे बरेच लोक आहेत, बरं का...

जर तुम्हाला यूट्यूबवर कमाई करायची असेल, तर तुम्हाला काहीतरी नवीन करण्यासाठी एक चॅनेल तयार करावे लागेल. आता तुम्हाला त्या अनोख्या विषयाशी संबंधित व्हिडिओ तुमच्या चॅनलवर पोस्ट करावा लागेल. तसेच व्हिडिओ ओरिजिनल असावा म्हणजे तो इतर कोणाचाही कॉपी केलेला नसावा. संगीत किंवा दृश्य कॉपी करू नये. जर तुमची सामग्री इतरांपेक्षा वेगळी असेल तर तुम्हाला अधिक व्हूवज मिळतात. ज्यानंतर तुमच्या सदस्यांची संख्या वाढू लागते आणि जसजसे सदस्य वाढतात तसतसे तुमचे व्ह्यू देखील वाढतात. जेव्हा तुमचे व्हिडीओ आणि तुमची सदस्य संख्या YouTube निकषांशी जुळते तेव्हा तुमचे खाते पैसे कमविण्यासाठी तयार होते. 

हे खाते तयार झाले की तुम्ही व्हिडीओ टाकला की कमाई सुरु होईल. परंतू याला वर सांगितल्याप्रमाणे खूप खटपटी असतात. आता नवीन ट्रीक पहा. यूट्यूबवर असे काही लोक आहेत जे केवळ व्हिडिओ बनवून कमाई करत आहेत परंतु हा व्हिडिओ त्यांचा नाही. लोक अनेक मूळ व्हिडिओंमधून लहान क्लिपिंग्ज घेतात आणि त्यांना त्यांच्या स्वत:च्या आवाजाने किंवा त्यांच्या अद्वितीय संगीताने YouTube वरील त्यांच्या चॅनेलवर अपलोड करतात. अशा परिस्थितीत, YouTube त्यांना मूळ व्हिडिओंप्रमाणे मोजते आणि पैसे अदा करते. हे सोपे आहे की नाही... 

टॅग्स :YouTubeयु ट्यूबMONEYपैसा