शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

Airtel, Jio, BSNL, VI युजर्स लक्ष द्या! आता सिम कार्ड खरेदीसाठी नियम बदलले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2024 15:02 IST

SIM Card : दूरसंचार विभागाने (DoT) आपल्या अधिकृत एक्स हँडलद्वारे सिम कार्डसाठी नवीन नियम जाहीर केले आहेत.

SIM Card :  नवी दिल्ली : मोबाईल सिमकार्ड खरेदीचे नियम बदलले आहेत. आता Airtel, Jio, BSNL किंवा Vodafone-Idea चे नवीन सिम खरेदी करताना युजर्सना जास्त काळजी घेण्याची गरज नाही. दूरसंचार विभागाने (DoT) आता पूर्णपणे पेपरलेस केले आहे. तुम्हाला आता नवीन सिमकार्ड घ्यायचे असेल किंवा ऑपरेटर बदलण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला यापुढे टेलिकॉम कंपन्यांच्या कार्यालयात जावे लागणार नाही. तुम्ही स्वतः तुमच्या सिम कार्डसाठी आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करू शकाल.

दूरसंचार विभागाने (DoT) आपल्या अधिकृत एक्स हँडलद्वारे सिम कार्डसाठी नवीन नियम जाहीर केले आहेत. तसेच, युजर्सना नवीन सिम कार्ड खरेदी करण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात ठेवण्यास सांगण्यात आले आहे. दूरसंचार विभागाचा हा नवा नियम युजर्सच्या वैयक्तिक कागदपत्रांसोबत होणारी फसवणूक रोखण्यासाठी आहे. तसेच डिजिटल इंडिया अंतर्गत संपूर्णपणे पेपरलेस प्रणाली कार्यान्वित करण्यात येणार आहे.

SIM Card चा नवीन नियम- दूरसंचार विभागाने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, मोठ्या टेलिकॉम रिफॉर्म करत असताना, आता युजर्ससाठी ई-केवायसी (नो युवर कस्टमर) सोबत सेल्फ-केवायसी आणले आहे.- प्रीपेड वरून पोस्टपेड नंबर बदलण्यासाठी युजर्सना टेलिकॉम ऑपरेटरकडे जाण्याची गरज नाही. युजर्स आता OTP म्हणजेच वन टाईम पासवर्डवर आधारित सेवेचा लाभ घेऊ शकतील.- युजर्स कोणतीही फोटोकॉपी किंवा डॉक्युमेंट शेअर न करता नवीन सिम कार्ड खरेदी करू शकतात.- दूरसंचार विभागाच्या या पूर्णपणे डिजिटल प्रक्रियेमुळे युजर्सच्या कागदपत्रांचा गैरवापर टाळता येईल. त्यामुळे आता कोणाच्याही नावाने बनावट सिम जारी करता येणार नाही.

काय आहे आधार बेस्ड e-KYC आणि सेल्फ KYC?दूरसंचार विभागाने केवायसी रिफॉर्ममध्ये आधार कार्ड आधारित ई-केवायसी, सेल्फ केवायसी आणि ओटीपी आधारित सेवा स्विचची सुविधा सुरू केली आहे. नवीन सिम कार्ड खरेदी करण्यासाठी युजर्स आता फक्त आधार कार्ड वापरू शकणार आहेत. टेलिकॉम कंपन्या युजर्सच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी आधार आधारित पेपरलेस व्हेरिफिकेशन फीचर वापरतील. यासाठी फक्त एक रुपये (जीएसटीसह) खर्च येईल.

एवढेच नाही तर दूरसंचार विभागाने युजर्सना आपले केवायसी ऑनलाइन पडताळण्यासाठी सेल्फ केवायसीची सुविधाही सुरू केली आहे. डिजीलॉकर वापरून युजर्स आपल्या केवायसीची स्वतः पडताळणी करू शकतील. जर कोणत्याही युजर्सला आपला नंबर प्रीपेडवरून पोस्टपेड किंवा पोस्टपेडवरून प्रीपेडवर स्विच करायचा असेल तर त्याला टेलिकॉम ऑपरेटरच्या कार्यालयात जाण्याची गरज नाही. कारण, युजर्स OTP आधारित पडताळणी प्रक्रियेद्वारे कनेक्शन बदलू शकतील.

टॅग्स :technologyतंत्रज्ञानMobileमोबाइल