आपल्याकडे अनेकांचे मोबाईल चोरीला जातात. पण, आपल्याला मोबाईल पेक्षा आपल्याकडे असलेला डेटा चोरी होईल याची भीती जास्त असते. तुमचे कॉन्टक्ट नंबर्स, फोटो, बँकिंग तपशील आणि इतर महत्त्वाची माहिती चुकीच्या लोकांच्या हातात जाईल याची आपल्याला भीती असते. तुमचा महत्वाचा डेटा चुकीच्या व्यक्तीच्या हाती जाऊ नये म्हणून तुम्हाला लगेच पाऊल उचलावी लागतात. डेटाच्या मदतीने गुन्हेगार तुमचे बँक खाते रिकामे करू शकतात आणि तुमच्या फोनवरून कोणत्याही संपर्काला चुकीचे संदेश पाठवू शकतात.
हे चिन्ह दिसताच समजून जा तुमचं व्हॉट्सअॅप हॅक झालंय; हॅकर्स तुमच्या खात्यात असा प्रवेश करतात
हे होऊ नये म्हणून तुम्हाला आधीच काळजी घ्यावी लागणार आहे. यासाठी काही सेटींग करुन ठेवावी लागणार आहे.
फोनला ट्रॅक करा
चोरी झालेला मोबाईल गुगल आणि अॅपलच्या ट्रॅकिंगने शोधता येऊ शकतो.
अँड्रॉइड फोन
तुमचा फोन ट्रॅक करण्यासाठी तुम्ही Find My Device वापरू शकता. यासाठी, दुसऱ्या फोन किंवा कॉम्प्युटरवरून Google Find My Device वेबसाइट उघडा. हरवलेल्या फोनमध्ये असलेल्या तुमच्या गुगल अकाउंटने लॉगिन करा. जर फोन चालू असेल आणि इंटरनेटशी कनेक्ट केलेला असेल तर तुम्हाला फोनचे ठिकाण दिसेल.
iPhone
दुसऱ्या डिव्हाइसवर iCloud ओपन करा. नंतर तुमच्या Apple आयडीने लॉगिन करा. याच्या मदतीने तुम्ही डिव्हाइसचे ठिकाण पाहू शकता. अॅपलमध्ये लास्ट नोन लोकेशन फिचर असते.
जर फोन ट्रॅक झाला असेल तर तो ताबडतोब लॉक करा आणि स्क्रीनवर मेसेज टाका.
अँड्रॉइड
Find My Device वर जा आणि Secure Device पर्याय निवडा आणि फोन लॉक करा. नंतर स्क्रीनवर एक कस्टम मेसेज (उदा. हा फोन हरवला आहे, कृपया या XXXX नंबरवर कॉल करा) दिसण्यासाठी पर्याय निवडा.
आयफोन
iCloud वर जा आणि लास्ट मोड ऑन करा. एक फोन नंबर आणि मेसेज पाठवा. हा मेसेज स्क्रिनवर दिसणार आहे.
सिम कार्ड ब्लॉक करा
तुमच्या नेटवर्क प्रोव्हायडरला संपर्क करा आणि सिम कार्ड ब्लॉक करा. एअरटेलचे सिम कार्ड असेल तर १२१ वर जा. जिओचे सिम कार्ड असेल तर १९९ वर कॉल करा. जर वोडाफोन-आयडिया चे असेल तर १९९ वर कॉल करा.
पासवर्ड बदला
अॅप्स आणि ऑनलाईन सेवांना सुरक्षित ठेवण्यासाठी पासवर्ड बदला. गुगल अकाऊंट सिक्युरिटीजवर जाऊन पासवर्ड बदला. तसेच फेसबुक आणि इन्स्टाग्रामचे पासवर्ड बदलण्यासाठी वेबसाईटवर जा. नेट बँकिंगचा पासवर्ड बदलण्यासाठी बँकेच्या वेबसाईटवर जावे लागेल.
डेटा सुरक्षित किंवा डिलिट करा
जर फोन ट्रॅक होत नसेल तर त्यात असलेला डेटा डिलीट करा.
अँड्रॉइड- फाइंड माय डिव्हाइसमध्ये इरेज डिव्हाइस पर्याय निवडा, फोन फॅक्टरी रीसेट होईल.
आयफोन- आयक्लॉडमधील इरेज आयफोन पर्यायावर जा. बॅकअप घेतल्यानंतर, तो डिलीट करा.