मीटिंगसाठी झुम अ‍ॅप वापरताय, तर सावधान!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2020 02:08 AM2020-06-22T02:08:00+5:302020-06-22T06:30:24+5:30

सायबर भामट्यांनी या अ‍ॅपच्या सदृश्य काही मालवेअर व फेकअ‍ॅप्स बनवली आहेत.

If you use the Zoom app for meetings, beware! | मीटिंगसाठी झुम अ‍ॅप वापरताय, तर सावधान!

मीटिंगसाठी झुम अ‍ॅप वापरताय, तर सावधान!

Next

मुंबई : कोरोनामुळे सध्या काळात बरेच नागरिक घरातून कार्यालयीन काम करत असल्याने आॅनलाइन मिटींगसाठी झूम या सॉफ्टवेअरचा वापर केला जात आहे. मात्र सायबर भामट्यांनी या अ‍ॅपच्या सदृश्य काही मालवेअर व फेकअ‍ॅप्स बनवली आहेत. त्यामुळे हे अ‍ॅप वापरताना सावधानता बाळगावी, असा इशारा महाराष्ट्र सायबर विभागातर्फे देण्यात आला आहे.
आपल्या सहकाऱ्यांबरोबरच्या आॅनलाइन मिटींग करिता झुम अ‍ॅप वापरायला सोपे असल्याने या सॉफ्टवेअरचा जास्त प्रमाणात उपयोग होत आहे. मात्र हे अ‍ॅप वापरताना चुकून काही मेलवेअर व फेक अ‍ॅप्स जर डाउनलोड केलीत तर तुमच्या सर्व मिटीग रेकॉर्ड होतील. तसेच तुमच्या मोबाइल /संगणकाचा ताबा देखील सायबर भामटे घेऊ शकतात, असे सायबर विभागाकडून सांगण्यात आले.
नागरिकांनी झूम अ‍ॅप हे अधिकृत वेबसाईट किंवा प्लेस्टोअरवरूनच डाउनलोड करावे. गोपनीय माहिती अशा मिटींगमध्ये बोलणे टाळावे किंवा संबंधित लोकांशी थेट बोलूनच त्यांना माहिती द्यावी. मिटिंग अ‍ॅडमिनने मिटिंगचे आयडी व पासवर्ड हे शक्यतो संबंधितांनाच थेट कळवावेत, तसेच पासवर्ड हा क्लिष्ट ठेवा, जेणेकरून दुसºया व्यक्तीला समजण्यास कठीण जाईल. तसेच संबंधित मिटिंग अ‍ॅडमिन /होस्टने फक्त मिटिंगच्या विषयाच्या संबंधित व्यक्तींची लॉगिन विनंती मान्य करावी, अशी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
>ही काळजी घ्या
तुम्ही जर मीटिंग होस्ट असाल तर तुम्हाला जो रँडम मिटींग आडी आणि पासवर्ड मिळेल त्याचाच शक्यतो वापर करा, तुमचा कुठलाही आडी किंवा पासवर्ड वापरू नका. मिटींग सेटिंग अशा प्रकारे बदल करा की अन्य कोणीही ते रेकॉर्ड कर शकणार नाही. मिटींग मध्ये सर्व अपेक्षित व्यक्तींनी लॉगिन केल्यावर सदर मिटींग लॉक करा जेणेकरून अन्य कोणी व्यक्ती त्यात अनाहूतपणे येऊ शकणार नाही. मिटिंगची लिंक आडी पासवर्ड ओपन फोरम वर शेअर करू नका.

Web Title: If you use the Zoom app for meetings, beware!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.