शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

...तर नोकरी सोडा; Netflix ची कर्मचाऱ्यांना ताकीद, इलॉन मस्क यांनी केली तारीफ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2022 11:24 IST

यापूर्वी मस्क यांनी नेटफ्लिक्स ‘वोक माईंड व्हायरस’ (Woke Mind Virus) मानसिकतेनं ग्रस्त असल्याचं संबोधलं होतं.

नेटफ्लिक्सच्या (Netflix) सबस्क्रायबर्संच्या संख्येत गेल्या १० वर्षांमध्ये पहिल्यांदा मोठी घसरण दिसून आली. २०२२ च्या पहिल्या तिमाहित ग्राहकांच्या संख्येत २ लाखांपेक्षा जास्त ग्राहक कमी झाले. इलॉन मस्क यांचा कंपनीच्या नफा आणि तोट्याशी थेट संबंध नसला तरी नेटफ्लिक्सचे युझर्स कमी झाल्यावरून त्यांनी कंपनीची शाळाच घेतली होती. तसंच त्यांनी नेटफ्लिक्स ‘वोक माईंड व्हायरस’ (Woke Mind Virus) मानसिकतेनं ग्रस्त असल्याचं संबोधलं होतं. यावेळी नेटफ्लिक्सवरील कन्टेन्ट पाहण्याजोगा नसल्याचंही ते म्हणाले होतं. इलॉन मस्क यांनी कंपनीला ओरिजिनल मुव्ही आणि शो तयार करण्याचा सल्ला दिला होता. दरम्यान, आता मस्क यांनी पुन्हा ट्वीट करत कंपनीचं कौतुक केलं आहे.  

जर आपल्या कन्टेंन्टशी सहमत नसतील तर कर्मचारी कंपनी सोडू शकतात अशी ताकीद नेटफ्लिक्सनं दिली. यावर आता टेस्लाचे प्रमुख इलॉन मस्क यांनी कौतुक करत हे उचलण्यात आलेलं चांगलं पाऊल असल्याचं म्हटलं आहे. नेटफ्लिक्सने आपल्या कल्चरल गाइडलाइन्स अपडेट केली आहेत आणि "कलात्मक अभिव्यक्ती" नावाचा एक विभाग जोडला आहे. तो लॅटफॉर्म अनेक प्रेक्षकांसाठी प्रोग्रामिंग कसा ऑफर करतो याबद्दल तपशीलवार माहिती देत असल्याचं वॉल स्ट्रीट जर्नलच्या अहवालात सांगण्यात आलं आहे. नेटफ्लिक्सनंच ठरवण्यापेक्षा प्रेक्षांना त्यांच्यासाठी काय योग्य आहे ठेरवू दे, असं नेटफ्लिक्सनं म्हटलं आहे. यापूर्वी नेटफ्लिक्सवर संताप व्यक्त करणाऱ्या मस्क यांनी आता नेटफ्लिक्सनं केलेल्या नव्या बदलाचं स्वागत केलं आहे. ‘गुड मुव्ह बाय नेटफ्लिक्स’ असं ट्वीट इलॉन मस्क यांनी केलं आहे. 

काय आहे वोक माइंड?वोकचा अर्थ वांशिक भेदभावाशी निगडीत आहे. मस्क यांच्या मते नेटफ्लिक्स प्लॅटफॉर्म याबाबत काही अधिकच संवेदनशील झाला आहे. यामुळे त्यांच्याकडे वांशिक भेदभावाशिवाय आणखी कोणताही कन्टेंन्ट उपलब्ध नाही. यापूर्वी एका समुदायानं वोक या शब्दाचा वापरक वांशिक भेदभावाच्या विरोधात केला होता. इलॉन मस्क यांनीदेखील याला वोक माईंड व्हायरस असं नाव दिलं आहे.

टॅग्स :Netflixनेटफ्लिक्सelon muskएलन रीव्ह मस्क