14 दिवसांचा बॅटरी बॅकअप आणि SpO2 सेन्सरसह Huawei Watch GT Runner स्मार्टवॉच लाँच; जाणून घ्या किंमत 

By सिद्धेश जाधव | Published: November 18, 2021 05:46 PM2021-11-18T17:46:41+5:302021-11-18T17:47:15+5:30

Huawei Smartwatch: Huawei Watch GT Runner मध्ये SpO2 सेन्सर, Heart Rate मॉनिटर असे हेल्थ फीचर्स देण्यात आले आहेत.  

Huawei watch gt runner Smartwatch launch price specifications features  | 14 दिवसांचा बॅटरी बॅकअप आणि SpO2 सेन्सरसह Huawei Watch GT Runner स्मार्टवॉच लाँच; जाणून घ्या किंमत 

14 दिवसांचा बॅटरी बॅकअप आणि SpO2 सेन्सरसह Huawei Watch GT Runner स्मार्टवॉच लाँच; जाणून घ्या किंमत 

Next

Huawei Smartwatch: Huawei Watch GT Runner चीनमध्ये सादर करण्यात आला आहे. हा Huawei Watch GT 3 चा हलका आणि स्पोर्टी व्हर्जन आहे. ज्यात 1.43 इंचाचा AMOLED डिस्प्ले, हार्ट रेट सेन्सर आणि ब्लड मध्ये ऑक्‍सीजन लेव्हल मोजण्यासाठी SpO2 सेन्सर असे फीचर्स देण्यात आले आहेत. या स्मार्टवॉचमध्ये 14 दिवसांचा बॅटरी बॅकअप मिळतो.  

Huawei Watch GT Runner चे स्पेसिफिकेशन्स 

Huawei Watch GT Runner स्‍मार्टवॉचमध्ये HarmonyOS चा स्पोर्ट्स व्हर्जन देण्यात आला आहे. यात 46mm डायलसह 1.43-इंचाचा वर्तुळाकार टच डिस्प्ले देण्यात आला आहे. हा अ‍ॅमोलेड डिस्प्ले 466x466 पिक्सल रिजोल्यूशनला सपोर्ट करतो. या वॉचमध्ये उजवीकडे दोन बटन स्मार्टवॉच कंट्रोल करण्यासाठी उपयुक्त ठरतात. या नव्या हुवावे स्मार्टवॉचमध्ये ट्रशियाीन 5.0+ हार्ट रेट, ब्‍लड ऑक्सिजन सॅचुरेशन (SpO2), झोप आणि तणाव मॉनिटर करणारे हेल्थ फीचर्स मिळतात. तसेच यात 100 पेक्षा जास्त स्पोर्ट्स मोड देण्यात आले आहेत.  

यात 2.4GHz बँड, NFC आणि ब्लूटूथ v5.2 असे कनेक्टिव्हिटी ऑप्शन मिळतात. हा वॉच ब्लूटूथ कॉलिंगला सपोर्ट करतो. तसेच यात जायरोस्कोप, अ‍ॅक्सेलेरोमीटर, दिशादर्शक, जियो-मॅग्नेटिक सेन्सर, एयर प्रेशर सेन्सर असे सेन्सर देखील देण्यात आले आहेत. हा Huawei स्मार्टवॉच IP68 रेटिंगसह बाजारात आला आहे आणि हा 50 मीटर खोल पाण्यात देखील वापरता येतो. या स्‍मार्टवॉचमधील 451mAh ची बॅटरी नॉर्मल युजवर 14 दिवस टिकते, असे कंपनीने सांगितले आहे.  

Huawei Watch GT Runner ची किंमत 

Huawei Watch GT Runner ची किंमत 2,188 चायनीज युआन (सुमारे 25,500 रुपये) आहे. हा स्मार्टवॉच डॉन ऑफ लाईट (ग्रे) आणि स्टारी नाइट रनर (ब्लॅक) कलरमध्ये विकत घेता येईल. 

Web Title: Huawei watch gt runner Smartwatch launch price specifications features 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.