Huawei Band 6 भारतात लाँच; जाणून घ्या वैशिष्ट्ये आणि किंमत
By सिद्धेश जाधव | Updated: July 9, 2021 15:40 IST2021-07-09T15:39:15+5:302021-07-09T15:40:24+5:30
Huawei Band 6 भारतात लाँच झाला आहे, हा बँड 14 दिवसांच्या बॅटरी लाइफसह सादर करण्यात आला आहे.

Huawei Band 6 या फिटनेस ट्रॅकर 12 जुलै पासून अमेझॉनवरून विकत घेता येईल.
Huawei ने भारतात Huawei Band 6 लाँच केला आहे. या फिटनेस बँड किफायतशीर किंमती लाँच झाला आहे. नवीन Huawei Band 6 या फिटनेस ट्रॅकर 12 जुलै पासून अमेझॉनवरून विकत घेता येईल. जर तुम्ही हा बँड 12-14 जुलै दरम्यान विकत घेतला तर तुम्हाला 1,990 रुपयांचा Huawei Bluetooth Speaker फ्री मध्ये मिळेल.
Huawei Band 6 चे स्पेसिफिकेशन्स
Huawei Band 6 मध्ये 194X368 पिक्सल रिजोल्यूशन असलेला 1.47 इंचाचा अॅमोलेड फुल व्यू डिस्प्ले देण्यात आला आहे. हा बँड 64% स्क्रीन टू बॉडी रेशियो सह येतो. यात 14 दिवसांचा बॅकअप देणारी बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. फक्त पाच मिनिटांच्या चार्जवर हा फिटनेस ट्रॅकर दोन दिवस वापरता येईल, असा दावा कंपनीने केला आहे. कारण Band 6 मध्ये नवीन स्मार्ट सेविंग पावर अल्गोरिथम देण्यात आला आहे.
हा बँड all-day SpO2 मॉनिटरिंगला सपोर्ट करतो. तसेच बॅंड 6 रियल टाइम हार्ट रेट, झोप आणि तणावाचे मॉनिटरिंग करतो. हा स्मार्टबॅंड 96 वर्कआउट मोड्सला सपोर्ट करतो. यात सायकलिंग, रनिंग आणि स्किपिंग सारख्या 11 प्रोफेशनल मोडचा समावेश आहे. त्याचबरोबर यात 85 कस्टमाइज मोड्स देखील देण्यात आले आहेत. युजर Huawei band 6 च्या मदतीने अनोळखी नंबर्सची माहिती देखील मिळवू शकतात.