शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
2
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
3
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
4
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
5
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
6
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
7
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
8
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
9
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
10
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
11
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
12
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
13
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
14
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
15
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
16
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
17
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
18
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
19
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या फोनवरून नवीन फोनवर अश्याप्रकारे कॉन्टॅक्ट्स ट्रान्सफर, जाणून घ्या सोप्पी पद्धत  

By सिद्धेश जाधव | Updated: June 3, 2021 16:30 IST

Contacts transfer from mobile: कॉन्टॅक्ट नवीन फोनवर ट्रान्सफर करणे छोटं पण महत्वाचं काम आहे.  

नवीन फोन घेतल्यावर एक मोठे काम असते, ते म्हणजे जुन्या फोनवरील डेटा नवीन फोनमध्ये टाकण्याचे. मोठ्या मोठ्या फाइल्स ट्रान्सफर करत असताना बऱ्याचदा कॉन्टॅक्टस ट्रान्सफर करणे राहून जाते. आणि त्यामुळे नवीन फोनवर कॉल आल्यावर आपण कोण? कोण तुम्ही? नंबर सेव नाही फोन बदलला आहे, अशी वाक्य वापरत असतो. हीच समस्या सोडवण्यासाठी मी आज तुम्हाला दोन अँड्रॉइड फोन्समध्ये कॉन्टॅक्टस कसे ट्रान्सफर करता येतात हे सांगणार आहे.  टेक्नॉलॉजीची आवड असणाऱ्या लोकांना या पद्धती माहित असतील परंतु, अनेकांना हे सोप्पे काम पण कठीण वाटते त्यांच्यासाठी हि माहिती देत आहे.  

1. SIM Card द्वारे कॉन्टॅक्ट करा ट्रान्सफर 

हि जुन्या फोनमधील कॉन्टॅक्ट नवीन फोनमध्ये ट्रान्सफर करण्याची सर्वात सोप्पी आणि जुनी पद्धत आहे. यासाठी तुम्हाला सर्वप्रथम सर्व कॉन्टॅक्ट्स को SIM मध्ये सेव कर. 

  • सर्वप्रथम जुन्या फोनमधील सर्व कॉन्टॅक्ट सिममध्ये सेव करा. यासाठी तुमच्या जुन्या अँड्रॉइड फोनमध्ये Contacts अ‍ॅप ओपन करून Settings मेन्यूवर जा. 
  • सेटिंगचा पर्याय वरच्या बाजूला उजव्या कोपऱ्यात असेल. सेटिंगमध्ये जाऊन तुम्हाला Import/Export असा पर्याय निवडायचा आहे. त्यानंतर Export to SIM card ऑप्शनची निवड करा. 
  • अश्याप्रकारे तुमचे जुन्या फोनमधील सर्व कॉन्टॅक्ट्स सिममध्ये ट्रान्सफर होतील. हि प्रक्रिया केल्यानंतर ते सिम नवीन फोनमध्ये टाका आणि पुन्हा Contacts ऍपमध्ये सेटिंग मेन्यूवर जा. 
  • फक्त यावेळी सेटिंगमध्ये Import/Export वर टॅप केल्यानंतर Import from SIM card चा ऑप्शन निवडा. अश्याप्रकारे सर्व जुने कॉन्टॅक्ट्स तुमच्या नवीन फोनमध्ये येतील. 

सूचना: जुन्या सिम कार्डमध्ये फक्त 250 कॉन्टॅक्ट्स राहू शकतात. तर, काही आधुनिक सिम कार्डमध्ये 250 पेक्षा जास्त कॉन्टॅक्टस राहू शकतात. 

2. Google अकॉउंटचा वापर करून कॉन्टॅक्ट ट्रान्सफर 

Google Cloud चा वापर करून युजर्स आपला डेटा एका फोनवरून दुसऱ्या फोनमध्ये ट्रान्सफर करू शकतात. डेटा सोबतच तुमच्या जुन्या फोनमधील कॉन्टॅक्ट पण नवीन फोनमध्ये पाठवले जातात.  

  • यासाठी तुम्हाला जुन्या फोनच्या सेटिंगमध्ये जाऊन अकाउंट्सवर जावे लागेल. तिथे गुगलवर क्लिक करा आणि चेक करा की कॉन्टॅक्टसच्या समोरील टॉगल बटण ऑन आहे कि नाही. 
  • जर ते ऑन नसेल तर तुम्ही ते ऑन करा. हे अ‍ॅक्टिव्हेट केल्यानंतर काही ही मिनटों तुमचे कॉन्टॅक्ट्स गुगल अकाउंटवर सिंक होतील. यासाठी मोबाईल इंटरनेटशी जोडलेला असणे आवश्यक आहे.  
  • त्यानंतर तुम्हाला नवीन स्मार्टफोनवर तुमच्या त्याच गुगल अकॉउंटचा वापर करून साइन इन करावे लागले. म्हणजे तुमचे कॉन्टॅक्ट नवीन फोनमध्ये पण दिसू लागतील.  
टॅग्स :Androidअँड्रॉईड