एका सिमवर दोन नंबर वापरण्याची फाडू ट्रिक; मित्रांना दिसणार नाही तुमचा नंबर  

By सिद्धेश जाधव | Updated: March 22, 2022 15:16 IST2022-03-22T15:16:12+5:302022-03-22T15:16:21+5:30

तुम्हाला जर एकच सिम कार्डवर दोन फोन नंबर्स वापरायचे असतील तर आमच्याकडे एक फाडू ट्रिक आहे. इथे तुम्ही नवीन फिजिकल सिम न घेता नंबर मिळवू शकता.  

How To Get Two Phone Numbers On One Sim Card Using Android App  | एका सिमवर दोन नंबर वापरण्याची फाडू ट्रिक; मित्रांना दिसणार नाही तुमचा नंबर  

एका सिमवर दोन नंबर वापरण्याची फाडू ट्रिक; मित्रांना दिसणार नाही तुमचा नंबर  

एक सिम कार्ड म्हटलं कि त्यावर एकच फोन नंबर वापरता येतो, हे तुम्हाला माहित असेल. काही स्मार्टफोनमध्ये सेकंड सिम किंवा मेमरी कार्ड यातील एकच वापरण्याचा पर्याय असतो. असे युजर्स मेमरीसाठी दुसऱ्या सिमचा त्याग करतात. परंतु आज आम्ही तुम्हाला एक अशी ट्रिक सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्ही एकाच सिम कार्डवर दोन फोन नंबर्सचा वापर करू शकाल.  

अशाप्रकारे मिळवा दुसरा फोन नंबर 

फक्त अँड्रॉइड स्मार्टफोनवर ही ट्रिक वापरता येते. तसेच चांगल्या इंटरनेट कनेक्शनची देखील आवश्यकता आहे. सर्वप्रथम तुमच्या अँड्रॉइड स्मार्टफोनमध्ये गुगल प्ले स्टोरवरून ‘Text Me: Second Phone Number’ नावाचं अ‍ॅप डाउनलोड करा. या अ‍ॅपवर तुमच्या जीमेल अकाऊंटच्या मदतीनं साइन-अप करा. म्हणजे तुमचं या अ‍ॅपवर अकाऊंट बनेल. त्यांनतर खाली असलेल्या ऑप्शन्समधून ‘नंबर्स’ ऑप्शन निवडा 

इथे तुम्ही तुमच्या आवडीचा कोणताही नंबर निवडू शकता. परंतु त्यासाठी तुम्हाला पैसे देखील मोजावे लागतील. पैसे दिल्यास दुसऱ्या देशांतील नंबर्स देखील मिळतात. तसेच अ‍ॅप इंस्टॉल केल्यावर तुम्हाला कॉल करण्यासाठी फ्री नंबर देखील दिला जातो. कॉल करण्यासाठी तुम्हाला क्रेडिटचा वापर करावा लागतो जे तुम्ही विकत घेऊ शकता किंवा जाहिरात बघून मोफत मिळवू शकता.  

 

Web Title: How To Get Two Phone Numbers On One Sim Card Using Android App 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.