शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

अरे व्वा! आता दर महिना होणार 1 लाखाची कमाई; घरबसल्या स्मार्टफोनवर करा फक्त 'हे' काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2022 15:53 IST

स्मार्टफोनच्या माध्यमातून लाखो रुपयांची कमाई देखील करता येते. स्मार्टफोनवर अनेक असे पर्याय उपलब्ध आहेत.

नवी दिल्ली - स्मार्टफोन हा जगण्याचा अविभाज्य भाग झाला आहे. लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वच जण मोठ्या प्रमाणात त्याचा वापर करतात. पण स्मार्टफोनच्या माध्यमातून लाखो रुपयांची कमाई देखील करता येते. स्मार्टफोनवर अनेक असे पर्याय उपलब्ध आहेत. ज्याच्या मदतीने तुम्ही हमखास पैसे मिळवू शकता. सोशल मीडियावर विविध विषयांवरील व्हिडीओ अपलोड करून अनेकजण मोठी कमाई करत आहे. गेल्या काही वर्षात व्हिडीओच्या माध्यमातून कमाई करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. याशिवाय तुम्ही फोनवरून ब्लॉग लिहून देखील कमाई करू शकता.

लोकांच्या आवडीच्या विषय़ावर व्हि़डीओ तयार केल्यास त्याला भरघोस प्रतिसाद मिळतो. सोशल मीडियावर सक्रिय असाल आणि तुमचे जास्त फॉलोअर्स असतील तर हे देखील कमाईचे एक माध्यम ठरू शकतं. यासाठी तुम्हाला फक्त सातत्याने वेगवेगळ्या विषयांवरील व्हिडीओ तसेच फोटो अपलोड करावे लागतील. सोशल मीडियावर जास्त फॉलोअर्स असल्यास अनेक कंपन्या त्यांच्या प्रोडक्ट्सची जाहिरात करण्यासाठी तुम्हाला पैसे देतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून स्टार झालेल्यांची संख्या देखील अधिक आहे. 

​फूड ब्लॉग

खाद्यपदार्थ हे सर्वांनाच आवडतात. खूप जण हे खवय्ये असून खाण्यासाठी नेहमीच विविध ठिकाणांना भेटी देत असतात. त्यामुळे सोशल मीडियावर फूड ब्लॉग ट्रेडिंगमध्ये आहे. तुम्ही ब्लॉगमध्ये त्या हॉटेल अथवा विशिष्ट पदार्थांविषयी माहिती देऊ शकता. तसेच, सोशल मीडियावर व्हिडिओ देखील पोस्ट करू शकता. तुम्ही जर क्वालिटी कंटेंट सादर केल्यास तुम्हाला प्रमोशन करण्यासाठी देखील पैसे मिळतील. याद्वारे लोक महिन्याला हजारो रुपयांची कमाई करत आहेत. सध्या इन्स्टाग्राम, फेसबुकवर अशाच पोस्ट पाहायला मिळतात. 

ट्रॅव्हल ब्लॉग 

जर तुम्हाला प्रवास करायला आवडत असेल आणि नवीन ठिकाणे एक्सप्लोर करायला आवडत असतील तर तुम्ही ट्रॅव्हल ब्लॉगद्वारे भरपूर कमाई करू शकता. तुम्‍हाला स्‍मार्टफोनच्‍या साहाय्याने तुम्‍हाला भेट देण्‍याच्‍या प्रत्‍येक ठिकाणाचे व्‍हिडीओ रेकॉर्ड करण्‍याचे आहेत आणि नवीन गोष्‍टी एक्स्‍प्‍लोर करण्‍याची आहेत, मग ते स्‍थानिक खाद्यपदार्थ असो किंवा तिथली एखादी इमारत. लोकांना ट्रॅव्हल ब्लॉगिंग पाहायला आवडतं आणि आजकाल ते ट्रेडींगमध्ये आहे आणि जर तुम्हाला लाखात कमवायचं असेल तर तुम्ही ही पद्धत वापरून पाहू शकता. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Smartphoneस्मार्टफोनMONEYपैसा