पेटीएम फास्टॅग डिएक्टिव्हेट कसा कराल? गुगलवर सर्च करतायत लोक, ही घ्या लिंक...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2024 06:36 PM2024-02-05T18:36:21+5:302024-02-05T18:40:48+5:30

पैसे ट्रान्सफर करण्यासाठी सर्वात सोपा असलेला पेटीएम फास्टॅग आता लोकांना नकोसा वाटू लागला आहे. पेटीएम पेमेंट बँकेवर आरबीआयने बंदी ...

How to Deactivate or cancel Paytm Fastag; see simple process, you will get Security deposit 150 rs | पेटीएम फास्टॅग डिएक्टिव्हेट कसा कराल? गुगलवर सर्च करतायत लोक, ही घ्या लिंक...

पेटीएम फास्टॅग डिएक्टिव्हेट कसा कराल? गुगलवर सर्च करतायत लोक, ही घ्या लिंक...

पैसे ट्रान्सफर करण्यासाठी सर्वात सोपा असलेला पेटीएम फास्टॅग आता लोकांना नकोसा वाटू लागला आहे. पेटीएम पेमेंट बँकेवर आरबीआयने बंदी घातली आहे. ही बंदी येत्या २९ फेब्रुवारीपासून लागू होणार आहे. यामुळे पेटीएमचे फास्टॅग वापरत असलेले ग्राहक चिंतेत सापडले आहेत. अनेकांना हा फास्टॅग बदलावा का, असा प्रश्न पडलेला आहे. 

पेटीएमनुसार ते दुसऱ्या बँकेशी पार्टनरशीप करणार आहेत. परंतु, ही जर तरची भाषा आहे. अशातच पेटीएम फास्टॅग डिअॅक्टिव्हेट कसा करावा, याबाबत ग्राहक गुगलवर सर्च मारू लागले आहेत. कारण या फास्टॅगमध्ये ग्राहकांचे १५० रुपये डिपॉझिट रक्कम अडकलेली आहे. 

पेटीएम वॉलेटमधील पैसेही आता वापरता येत नाहीएत. अनेक ठिकाणी फोन पे, गुगल पे सारख्या कंपन्यांनी पेटीएम बारकोडची जागा घेण्यास सुरुवात केली आहे. यामुळे त्या बारकोडवरून पेमेंट करायचे झाल्यास बँक अकाऊंटमधून पैसे जात आहेत. यामुळे हॉटेल, किराणा दुकान आदी ठिकाणी झटकन जे पैसे ट्रान्सफर होत होते ते आता करता येत नाहीएत. यामुळे पेटीएम वॉलेटमधील पैसे अडकून पडू लागले आहेत.

याच वॉलेटमधून फास्टॅगला पैसे जातात. जेव्हा फास्टॅग वापला जातो तेव्हा ते वॉलेटमधील पैसे वळते केले जातात. हे पैसे इतरही गोष्टींसाठी वापरता येत होते. यामुळे इतर कंपन्या, बँकांच्या फास्टॅगच्या तुलनेत पेटीएमचा फास्टॅग वापरणे खूपच सोपे होते. आता या ग्राहकांची कुचंबना होत आहे. 

यासाठी तुम्हाला या लिंकवर मोबाईलवरून क्लिक करावे लागणार आहे. ही लिंक तुम्हाला पेटीएमच्या कस्टमर केअरला घेऊन जाईल. तिथून तुम्ही फास्टॅग कॅन्सल करू शकता. तो कॅन्सल केल्यावर तुम्हाला फास्टॅगचे सिक्युरिटी डिपॉझिट वॉलेटमध्ये वापरण्यासाठी मिळणार आहे. 

Web Title: How to Deactivate or cancel Paytm Fastag; see simple process, you will get Security deposit 150 rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.