शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा फोटो समोर, ओळखही पटली, दोघे पाकिस्तानी तर दोघे स्थानिक
2
'आम्हाला न्याय हवाय', अमित शाहांना बघताच मृतांच्या नातेवाईकांच्या अश्रूंचा फुटला बांध
3
IPL 2025: भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध! ना फटाके, ना चीअरलीडर्स; खेळाडू, पंच बांधणार काळ्या फिती
4
"इथले सर्वजण प्रचंड घाबरलेत"; रुपाली पाटील ठोंबरे काश्मीरमध्ये अडकल्या, सरकारला केली विनंती
5
पहलगाम म्हणजे काश्मीराचा स्वर्ग; हिरव्यागार दऱ्या आणि खळकळणाऱ्या नद्या; पर्यटक का करतात हजारो खर्च?
6
हॉटेल बाहेर बसलेले, गोळी लागली,अर्धा तास मदत मिळाली नाही;पुण्यातील पर्यटकांसोबत नेमकं काय घडलं?
7
Terrorist Attack: महाजन श्रीनगरला रवाना, तीन मंत्री विमानतळावर; मुख्यमंत्री कार्यालयाने काय माहिती दिली?
8
Pahalgam Attack: हेच ते तीन नराधम! निरपराध भारतीयांचा जीव घेणाऱ्या दहशतवाद्यांचं चित्र प्रशासनाकडून जारी
9
Pahalgam Terror Attack: 'हा' आहे पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड! कटामध्ये तिघांचा समावेश
10
Pahalgam Attack : "न्याय मिळायलाच पाहिजे..."; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर विराट कोहली संतापला
11
लग्नाचा जल्लोष संपलाच नाही इतक्यात घरातून तिरडी उठणार; दहशतवादी हल्ल्यात शुभमचा मृत्यू
12
Pahalgam Attack Update : "लग्नानंतर त्याला स्वित्झर्लंडला जायचं होतं पण..."; ढसाढसा रडले आजोबा, गमावला एकुलता एक मुलगा
13
३ राजयोगात गुरुवारी वरुथिनी एकादशी: ७ राशींना शुभ फले, यशच यश; भरघोस भरभराट, पैसाच पैसा!
14
"हा देशातील दोन समाजांमध्ये वाद निर्माण होऊन देश अस्थिर करण्याचा कट’’, विजय वडेट्टीवार यांचा दावा   
15
Pahalgam Attack Update : पाकिस्तानच्या 'उरी' धडधड वाढली! सर्जिकल स्ट्राईकची भीती; रात्रीपासूनच हवाई दलाला केले ॲलर्ट
16
पहलगाम इथं पर्यटकांवर हल्ला करणारे दहशतवादी भारतात कसे घुसले?; समोर आला मार्ग
17
दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधील पर्यटनाचं काय होणार? स्थानिक लोकांचं सर्वाधिक नुकसान
18
Pahalgam Attack Update : "भाऊ, वहिनी मॅगी खात होते, गोळी लागताच रक्ताच्या थारोळ्यात..."; काळजात चर्र करणारी घटना
19
रिझर्व्ह बँकेनं छत्रपती संभाजीनगर येथील 'या' बँकेचा परवाना केला रद्द, जमा रकमेचं काय होणार? 
20
हृद्रयद्रावक! काश्मीर खोऱ्यात पतीच्या मृतदेहाशेजारी स्तब्ध पडून राहिली नवी नवरी

How to Check Noise of LoudSpeaker: भोंग्यांचा आवाज सामान्य जनता कसा मोजणार? मुंबई पोलिस आयुक्तांनी १२ मार्चलाच आदेश काढलेला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2022 22:17 IST

तुम्ही देखील कोणत्याही यंत्रणेशिवाय आवाजाची तीव्रता मोजू शकता. डेसिबलमध्ये ही तीव्रता मोजली जाते. यासाठी तुम्ही तुमचा मोबाईल वापरू शकणार आहात.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशीदींवरील भोंग्यांवरून आपली शेवटची भूमिका स्पष्ट केली आहे. काही वेळापूर्वीच त्यांनी पत्रक जारी करत राज्य सरकार, मनसे कार्यकर्ते, पोलीस आणि सामान्य नागरिकांना आवाहन केले आहे. याचबरोबर ज्या मशीदींनी भोंगे काढले, त्यांचेही आभार मानले आहेत. या पत्रकात राज यांनी डेसिबलची मर्यादा किती घातलेली आहे याची उदाहरणे दिली आहेत. 

असे असले तरी तुम्ही देखील कोणत्याही यंत्रणेशिवाय आवाजाची तीव्रता मोजू शकता. डेसिबलमध्ये ही तीव्रता मोजली जाते. यासाठी तुम्ही तुमचा मोबाईल वापरू शकणार आहात. गुगल अ‍ॅपवर अनेक अ‍ॅप आहेत जी तुम्हाला आवाजाची तीव्रता मोजण्यास मदत करतात. मोबाईलमध्ये ट्रस्टेड अ‍ॅप, हाय रेटिंगची किंवा चांगल्या कमेंट असणारी अ‍ॅप तुम्ही डाऊनलोड करू शकता. याद्वारे तुम्ही लाऊडस्पीकर किंवा डीजे आदींच्या आवाजाची तीव्रता मोजू शकता. 

मुंबई पोलिसांनी १२ मार्च २०२२ ला एक आदेश काढला होता. यामध्ये पोलीस यापुढे कोणत्याही फ्री आवाज तीव्रता मोजणी अॅपद्वारे नोंदविलेली तीव्रता ग्राह्य धरणार असल्याचे म्हटले होते. त्यापूर्वी National Environmental Engineering Research Institute (NEERI) ने बनविलेल्या मोबाईल अॅपवर नोंदविलेल्या आवाजाच्या तक्रारी पोलीस नोंदवून घेत होते. 

तुम्ही कोणता डाऊनलोड कराल...तुम्हाला एखाद्या लाऊडस्पीकरचा किंवा कार्यक्रमातून येत असलेला गोंगाट मोजायचा असेल आणि पोलिसांत तक्रार करायची असेल तर तुम्ही गुगल प्ले स्टोअरवर decibel meter, noise meter किंवा NEERI असे सर्च करावे. याद्वारे चांगले डाऊनलोड झालेली, कमेंट असलेली अ‍ॅप डाऊनलोड करावीत. सध्या अशा अ‍ॅपना मागणी मोठी असल्याने फेक अ‍ॅप किंवा फ्रॉड करणारी अ‍ॅपदेखील ट्रेंडमध्ये येऊ शकतात. यामुळे ही अ‍ॅप डाऊनलोड करताना खबरदारी घ्यावी. 

मुंबई पोलीस आयुक्त काय म्हणालेले...“नागरिक कोणतेही मोफत ध्वनी मीटर डाउनलोड करू शकतात, त्यांच्या फोनवर डेसिबल पातळीचे रीडिंग घेऊ शकतात आणि स्थानिक पोलिसांच्या ट्विटर खात्यावर पाठवू शकतात किंवा 100 वर तक्रार नोंदवू शकतात. उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल आणि बांधकाम साइट्ससाठी आवाजाचे नियम लागू केले जातील. अंमलबजावणी केली आहे,” असे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी सांगितले होते. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेMosqueमशिद