शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

Jio युजर्स सतर्क व्हा! तुमच्या एका चुकीमुळे कॉल हिस्ट्री दुसऱ्याच्या हाती लागू शकते

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2024 14:27 IST

Jio : जिओ युजर्स आपल्या फोनचा रिचार्ज प्लॅन, व्हॅलिडिटी इत्यादी तपासण्यासाठी फोनमध्ये My Jio ॲप इन्स्टॉल करतात.

नवी दिल्ली : जिओ (Jio) युजर्सना, त्यांची एक चूक महागात पडू शकते आणि त्यांची कॉल हिस्ट्री दुसऱ्याच्या हातात जाऊ शकतो. अशा परिस्थितीत याचा लाखो युजर्सवर मोठा परिणाम होऊ शकतो. रिलायन्सजिओचे भारतात ४५ कोटींहून अधिक सक्रिय युजर्स आहेत. 

जिओ युजर्स आपल्या फोनचा रिचार्ज प्लॅन, व्हॅलिडिटी इत्यादी तपासण्यासाठी फोनमध्ये My Jio ॲप इन्स्टॉल करतात. अशीच एक सुविधा My Jio ॲपमध्ये दिली आहे, जिथे तुमच्या प्रीपेड नंबरवरून केलेल्या सर्व कॉलची हिस्ट्री दिसते. त्यामुळे युजर्सकडून छोटीशी चूक झाली तर ही कॉल हिस्ट्री कोणाच्या तरी हाती लागू शकते.

MyJio ॲपमध्ये तुमच्या नंबरवर ॲक्टिव्ह असलेल्या सर्व सर्व्हिसची डिटेल्स असते. ज्यामुळे एखाद्याला त्याचा ॲक्सेस मिळणे धोकादायक ठरू शकते. MyJio ॲपमध्ये लॉग इन करण्यासाठी युजर्सचा मोबाईल नंबर आवश्यक आहे. यानंतर, नंबरवर एक ओटीपी प्राप्त होईल, जो प्रविष्ट केल्यानंतर तुम्हाला या ॲपमध्ये ॲक्सेस मिळतो. 

जर चुकून एखाद्याने MyJio ॲपवर लॉग इन करण्यासाठी तुमचा जिओ नंबर वापरला आणि चुकून त्याला ओटीपी आला तर तुमचे सर्व गुपित उघड होऊ शकतात. तुम्ही कोणत्या नंबरवर कॉल केला, किती वेळा आणि किती वेळ केला, याची माहिती मिळेल. 

इतकेच नाही तर कोणीतरी तुमच्या नंबरवर सक्रिय इंटरनेट डेटा पॅक आणि इतर सर्व्हिसेसची माहिती देखील मिळवू शकते. अशा परिस्थितीत तुम्ही चुकूनही तुमचा ओटीपी कोणाशीही शेअर करू नये. MyJio ॲपमध्ये तुम्ही तुमच्या नंबरवरून कॉल आणि मेसेजची हिस्ट्री देखील तपासू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या फोनमध्ये MyJio ॲप इंस्टॉल करावे लागेल आणि तुमच्या जिओ नंबरने लॉग इन करावे लागेल.

अशा प्रकारे कॉल हिस्ट्री तपासा...- पहिल्यांदा फोनमध्ये MyJio ॲप डाउनलोड करा आणि इंस्टॉल करा.- यानंतर, तुमच्या जिओ नंबरने लॉग इन करण्यासाठी नंबर आणि ओटीपी टाका.- तुम्ही ॲपमध्ये लॉग इन करताच तुम्हाला MyJio ॲपचा इंटरफेस दिसेल.- येथे तुम्हाला तुमचे नाव आणि प्रोफाइल आयकॉन उजव्या वरच्या कोपऱ्यात दिसेल.- त्यावर टॅप करताच तुम्हाला मोबाईलचा ऑप्शन दिसेल.- तुम्ही येथे टाइप करताच, स्टेटमेंटवर जा आणि तुमच्या नंबरवरून केलेल्या कॉलची हिस्ट्री तपासा.- जिओ युजर्स  येथे तीन महिन्यांपर्यंतची कॉल हिस्ट्री तपासू शकतात.

टॅग्स :JioजिओRelianceरिलायन्सReliance Jioरिलायन्स जिओ