शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
2
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
4
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
5
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
6
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
7
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
8
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
9
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
10
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
11
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
12
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
13
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
14
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
15
शताब्दी वर्षात संघाचे ध्येय: 'राष्ट्रसेवेत' समाजाचा सहभाग! स्वयंसेवकांचे कुटुंब कसे बनले संघाच्या कार्याचे केंद्र?
16
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
17
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
18
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
19
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
20
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर पर्सनल मॅसेज कसा पाठवायचा? असे जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2019 17:08 IST

या नववर्षात WhatsApp वर PiP मोड, डार्क मोड, ग्रुप कॉल शॉर्टकट यासह अनेक भन्नाट फीचर्स येणार आहेत. याच यादीत आता आणखी एका फीचरचा समावेश झाला आहे.

मुंबई : व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर दररोज हजारो मॅसेज येत असतात. तसेच या ग्रुपमध्ये सदस्यही बरेच असतात. यामुळे या ग्रुपवरील एखाद्याला खासगीमध्ये मॅसेज पाठवायचा असल्यास अन् त्याच्या नंबर सेव्ह नसल्यास सेव्ह करण्यापासूनच्या गोष्टी कराव्या लागतात. आता असे काही करावे लागणार नाही. व्हॉट्सअ‍ॅपच्या नवीन फिचरद्वारे तुम्ही थेट त्या व्यक्तीला मॅसेज करू शकणार आहात. चला जाणून घेऊयात. 

स्टेप 1 - पहिल्यांदा तुम्हाला ज्याला मॅसेज पाठवायचा असेल त्याने पाठविलेला मॅसेज सिलेक्ट करावा लागेल. 

स्टेप 2 - यानंतर उजव्या बाजुला कोपऱ्यात तीन डॉटवर क्लिक करून Reply Privately या ऑप्शनवर क्लिक करावे लागेल. 

स्टेप 3 - यानंतर तुम्ही त्या व्यक्तीच्या खासगी चॅटवर रिडायरेक्ट होता. यावर केलेले मॅसेज केवळ त्याच व्यक्तीला जातात. 

फायदा काय? ग्रुपवर सदस्यामध्ये बऱ्याच विषयांवर बोलणे होते. चर्चा होते. यावेळी एखाद्या व्यक्तीला त्याचे म्हणणे चुकीचे आहे, किंवा उत्तर दिल्यास काहीवेळा त्याला अपमानजनक वाटू शकते. कारण इतर सदस्यही हे पाहतात. यामुळे हे फिचर चांगले ठरणार आहे. याशिवाय एखाद्या व्यक्तीचा वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस किंवा चांगले काम केले असेल तर खासगी मॅसेजद्वारे त्याचे अभिनंदनही करता येते. 

 

2019 या नववर्षात WhatsApp वर PiP मोड, डार्क मोड, ग्रुप कॉल शॉर्टकट यासह अनेक भन्नाट फीचर्स येणार आहेत. याच यादीत आता आणखी एका फीचरचा समावेश होणार आहे. WhatsApp वर लवकरच एकाच वेळी 30 ऑडिओ क्लिप पाठवणं शक्य होणार आहे. या नव्या अपडेट फीचरमुळे युजर्सला ऑडिओ क्लिप पाठवणे आणखी सोपे होणार आहे.

टॅग्स :WhatsAppव्हॉटसअ‍ॅपtechnologyतंत्रज्ञान