WhatsApp Tricks: नंबर सेव न करता पाठवा व्हॉट्सअ‍ॅप मेसेज; अनोळखी लोकांना ठेवा खाजगी माहितीपासून दूर 

By सिद्धेश जाधव | Published: July 21, 2021 07:07 PM2021-07-21T19:07:12+5:302021-07-21T19:07:45+5:30

या व्हॉट्सअ‍ॅप ट्रिकचा वापर करून तुम्ही WhstApp वरून तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये नसलेल्या व्यक्तीला मेसेज पाठवू शकता.  

How to send message on whatsapp without saving mobile number in phone  | WhatsApp Tricks: नंबर सेव न करता पाठवा व्हॉट्सअ‍ॅप मेसेज; अनोळखी लोकांना ठेवा खाजगी माहितीपासून दूर 

WhatsApp Tricks: नंबर सेव न करता पाठवा व्हॉट्सअ‍ॅप मेसेज; अनोळखी लोकांना ठेवा खाजगी माहितीपासून दूर 

googlenewsNext

WhatsApp जितका लोकप्रिय आहे तितकाच त्रासदायक देखील आहे. तुम्हाला माहित असेल कि आपण एखाद्या व्यक्तीचा नंबर आपल्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये सेव केला कि ती व्यक्ती आपला प्रोफाइल फोटो आणि स्टेटस अपडेट बघू शकते. कधी कधी एखाद्या छोट्या कामासाठी आपण अनोळखी लोकांचा व्हॉट्सअ‍ॅप नंबर घेतो आणि ते काम झाल्यावर देखील तो नंबर आपल्या लिस्टमध्ये पडून राहतो. अश्या छोट्या कामासाठी सेव केलेले नंबर्स आपल्या खाजगी आयुष्यात सहज डोकावू लागतात.  

हे टाळण्यासाठी पुढे आम्ही एक व्हॉट्सअ‍ॅप ट्रिक सांगितली आहे. या ट्रिकचा वापर करून तुम्ही नंबर सेव न करता त्या नंबरला व्हॉट्सअ‍ॅप मेसेज पाठवू शकता. नंबर सेव न करता व्हॉट्सअ‍ॅप पाठवण्यासाठी पुढील पद्धत वापरा.  

WhatsApp नंबर सेव न करता मेसेज पाठवण्यासाठी 

ही ट्रिक Android फोन आणि iOS दोन्ही डिवाइसवर वापरता येते. यासाठी तुम्हाला थर्ड पार्टी अ‍ॅप डाउनलोड करण्याची देखील गरज नाही.  

  • यासाठी सर्वप्रथम तुमच्या फोन ब्रॉउजरमध्ये http://wa.me/xxxxxxxxxx किंवा http://api.whatsapp.com/send?phone=xxxxxxxxxx लिंक पेस्ट करा. 
  • लिंक मध्ये xxxxxxxxxx च्या जागी कंट्री कोडसह ज्या मोबाईल नंबरवर मेसेज पाठवायचा आहे तो टाका. उदाहणार्थ, 8828800039 या भारतीय क्रमांकावर व्हॉट्सअ‍ॅप मेसेज पाठवण्यासाठी तुम्हाला https://api.whatsapp.com/send/?phone=918828800039 अशी लिंक बनवावी लागेल.  
  • त्यानंतर आता तुम्हाला एक WhatsApp वेबपेज दिसेल, तिथे एका हिरव्या बटणसह तो फोन नंबर येईल. 
  • या ग्रीन बटणवर क्लिक करताच तुम्ही थेट व्हॉट्सअ‍ॅपवर जाल आणि तो नंबर सेव न करता व्हॉट्सअ‍ॅपवरून मेसेज करू शकाल.

Web Title: How to send message on whatsapp without saving mobile number in phone 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.