अॅपलने अलीकडेच बहुप्रतिक्षित आयफोन १७ मालिका लॉन्च केली असून, त्याची विक्री आजपासून (१९ सप्टेंबर २०२४) अधिकृतपणे सुरू झाली आहे. आयफोन १७ मालिकेवर पहिल्याच सेलमध्ये आकर्षक आणि लक्षणीय ऑफर्स उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, ज्या ग्राहकांसाठी फायद्याच्या ठरत आहेत. या सेलमध्ये ग्राहकांना असंख्य ऑफर्स दिल्या जात आहेत, ज्यात विविध बँक ऑफर्स, एक्स्चेंज बोनस आणि नो-कॉस्ट ईएमआय यांसारख्या सुविधांचा समावेश आहे.
दरम्यान, ९ सप्टेंबर रोजी अॅपलने त्यांच्या अवे ड्रॉपिंग कार्यक्रमात आयफोन १७ मालिका लॉन्च केली, ज्यात आयफोन १७, आयफोन एअर, आयफोन १७ प्रो आणि आयफोन १७ प्रो मॅक्स अशा चार मॉडेलचा समावेश आहे. तर, आजपासून खरेदीसाठी उपलब्ध झालेल्या आयफोन १७ वर ग्राहकांना विशेष ऑफर आणि ईएमआय पर्यायांसह प्रीमियम फोन खरेदी करण्याची संधी उपलब्ध झाली.
आयफोन १७: बँक ऑफर्स आणि कॅशबॅक
अमेरिकन एक्सप्रेस, अॅक्सिस बँक आणि आयसीआयसीआय बँक कार्ड वापरून अॅपल वेबसाइट आणि स्टोअरमधून खरेदी करणाऱ्या ग्राहकांना ५,००० पर्यंतची त्वरित सूट मिळेल. सहा महिन्यांपर्यंत नो-कॉस्ट ईएमआय पर्याय देखील उपलब्ध आहे.
आयफोन १७: ईएमआय प्लान आणि एक्स्जेंच ऑफर
- आयफोन १७ हा १२,९८३ रुपये प्रति महिना पासून सुरू होणाऱ्या ईएमआयवर खरेदी करता येईल.- आयफोन एअर हा १९,१५० रुपये प्रति महिना पासून सुरू होणाऱ्या ईएमआयवर उपलब्ध आहे.- आयफोन १७ प्रो आणि प्रो मॅक्स हे २१,६५० रुपये प्रति महिना पासून सुरू होणाऱ्या ईएमआयवर खरेदी करता येतील.- ग्राहकांना एक्स्चेंज ऑफर अतर्गत ६४,००० रुपयांपर्यंत बचत करता येईल.
रिटेलर्स ऑफर आणि डिस्काउंट
इंग्राम माइक्रो: आयफोन १७ वर ६,००० रुपये आणि इतर मॉडेल्सवर ४,००० रुपयांचा इन्स्टंट कॅशबॅक दिला जात आहे, तसेच २४ महिन्यांपर्यंत नो-कॉस्ट ईएमआय पर्याय उपलब्ध आहे.
क्रोमा आणि विजय सेल्स:आयफोन १७ वर ६,००० आणि इतर मॉडेल्स वर ४,००० ची सूट दिली जात आहे. विजय सेल्स मध्ये ईएमआय ४,४७१/महिना पासून सुरू होते.
रेडिंग्टन: आयफोन १७ वर ६,००० पर्यंत कॅशबॅक आणि ७,००० पर्यंत एक्सdचेंज बोनस मिळत आहे. प्रो आणि एअर मॉडेल्स वर ४,००० रुपये कॅशबॅक दिले जात आहे.