व्हॉट्सअॅप डिलीट न करता असे व्हा इनव्हिजिबल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2018 03:26 PM2018-11-25T15:26:16+5:302018-11-25T17:27:09+5:30

कधी कधी व्हॉट्सअॅपच्या मेसेजचा खूप कंटाळा येतो. सोशल मीडिया पासून लांब जावसं वाटतं. मात्र अशावेळी व्हॉट्सअॅप डिलीट न करता इनव्हिजिबल होता येते. व्हॉट्सअॅपवर हवं तेव्हा कसं अदृश्य व्हायचं हे जाणून घेऊया. 

How to go 'invisible' on WhatsApp without deleting app | व्हॉट्सअॅप डिलीट न करता असे व्हा इनव्हिजिबल

व्हॉट्सअॅप डिलीट न करता असे व्हा इनव्हिजिबल

Next
ठळक मुद्देव्हॉट्सअॅप हे संवाद साधण्याचे अत्यंत लोकप्रिय आणि प्रभावी माध्यम आहे. व्हॉट्सअॅप डिलीट न करता इनव्हिजिबल होता येते.व्हॉट्सअॅप काही काळासाठी डिलीट करणे व पुन्हा इन्स्टॉल करणे हे दरवेळी शक्य नसते.

नवी दिल्ली - व्हॉट्सअॅप हे संवाद साधण्याचे अत्यंत लोकप्रिय आणि प्रभावी माध्यम आहे. व्हॉट्सअॅप नेहमीच आपल्या युजर्ससाठी नवनवीन फीचर्स आणत असतं. व्हॉट्सअॅपवर चॅट करत असताना एखादा मेसेज आपल्याला आल्यावर आपण तो वाचल्यास ब्ल्यू कलर टीक होते. त्यामुळे समोरच्या व्यक्तीला आपण तो मेसेज वाचला याची माहिती मिळते. पण कधी कधी व्हॉट्सअॅपच्या मेसेजचा खूप कंटाळा येतो. सोशल मीडियापासून लांब जावसं वाटतं. मात्र अशावेळी व्हॉट्सअॅप डिलीट न करता व्हॉट्सअॅपवर इनव्हिजिबल होता येते. व्हॉट्सअॅपवर हवं तेव्हा कसं अदृश्य व्हायचं हे जाणून घेऊया. 

व्हॉट्सअॅप स्मार्टफोनमध्ये इन्स्टॉल केल्यापासून त्याचे नोटिफिकेशन्स आपल्याला येतच राहतात. व्हॉट्सअॅप काही काळासाठी डिलीट करणे व पुन्हा इन्स्टॉल करणे हे दरवेळी शक्य नसते. व्हॉट्अॅपवर ब्लू टिक जरी तुम्ही हाइड करू शकता. मात्र व्हॉट्सअॅप चालू करताच तुम्ही सर्वांना ऑनलाईन दिसता. परंतु आता व्हॉट्सअॅपवर मर्यादित काळासाठी सायलेंट राहता येणार आहे. व्हॉट्सअॅपवर इनव्हिजिबल होण्यासाठी स्मार्टफोनवर 'मोबीवूल' किंवा 'नोरूट फायरवॉल' सारखं एखादं अॅप डाऊनलोड करा. या फायरवॉल अॅपद्वारे यूजर्स आपल्याला नको असलेल्या अॅपचा इंटरनेटपुरवठा खंडित करू शकतात. फायरवॉल अॅपद्वारे तुम्हाला नेहमीप्रमाणे जीमेलवरून ईमेल येतील. 

व्हॉट्सअॅप डिलीट न करता असे व्हा इनव्हिजिबल

व्हॉट्सअॅप ट्यून बंद करा 

व्हॉट्सअॅपवर येणारे कॉल आणि मेसेजसाठी एक रिंगटोन निवडावी लागते. मात्र आपल्याला ही रिंगटोन नको असेल तर एक ट्रिक आहे. त्यासाठी केवळ 2 सेकंदासाठी ऑडिओ रेकॉर्डर अॅपच्या मदतीने शांतता रेकॉर्ड करा. त्यानंतर तो आवाज सेव्ह करा. त्यानंतर व्हॉट्सअॅपच्या सेटिंगमध्ये जाऊन नोटिफिकेशन बटणवर क्लिक करा.  त्यामध्ये रिंगटोनवर क्लिक करून आपण ऑडिओ रेकॉर्डमध्ये सेव्ह केलेली फाईल सिलेक्ट करा. अशापद्धतीने तुम्ही व्हॉट्सअॅप ट्यून बंद करा.

व्हॉट्सअॅप ऑयकॉन्स आणि डॉट्सच्या स्वरूपात असलेले नोटिफिकेशन बंद करा

स्मार्टफोनमध्ये सर्वप्रथम अॅप्समध्ये क्लिक केल्यावर फोनमधील अॅप्सची एक लिस्ट ओपन होईल. त्यामध्ये व्हॉट्सअॅपवर क्लिक करा. त्यामध्ये नोटिफिकेशनवर क्लिक करून व्हॉट्सअॅपवरील नोटिफिकेशन बंद करा. त्यासोबतच व्हॉट्सअॅपवर व्हायब्रेशन आणि पॉपअप्स बंद करा. 

व्हॉट्सअॅप नोटिफिकेशन लाईट बंद करा

व्हॉट्सअॅपवर सेटिंगमध्ये जाऊन नोटिफिकेशनवर क्लिक करून लाईट या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर ननचा पर्याय निवडून बंद करा. याच्या माध्यमातून मेसेज येणार मात्र मोबाईलवर लाईट पेटणार नाही. त्यामुळे अशापद्धतीने तुम्ही व्हॉट्सअॅपपासून इनव्हिजिबल राहू शकता. 

व्हॉट्सअॅपमुळे जर डेटा वाया जातोय असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही फोनच्या सेटिंगमध्ये जा. त्यामध्ये फोर्स स्टॉपच्या पर्यायावर क्लिक करा. त्यासोबतच व्हॉट्सअॅपच्या सर्व परमिशन बंद करा. अशापद्धतीने  व्हॉट्सअॅप डिलीट न करता तुम्ही सोप्या पद्धतीने व्हॉट्सअॅपवर येणारे मेसेज रोखू शकता. 

Web Title: How to go 'invisible' on WhatsApp without deleting app

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.