अशाप्रकारे Truecaller वरील अकॉउंट, नाव आणि नंबर करा डिलीट; फॉलो करा सोप्प्या स्टेप्स 

By सिद्धेश जाधव | Published: October 2, 2021 07:17 PM2021-10-02T19:17:21+5:302021-10-02T19:18:59+5:30

Truecaller tips and trick: जर इतरांना तुमचे नाव Truecaller वर दाखवायचे नसेल तर तुम्ही तुमचा नंबर डीलिस्ट करू शकता.  

How to delete your truecaller account and know here how to remove your number from truecaller  | अशाप्रकारे Truecaller वरील अकॉउंट, नाव आणि नंबर करा डिलीट; फॉलो करा सोप्प्या स्टेप्स 

अशाप्रकारे Truecaller वरील अकॉउंट, नाव आणि नंबर करा डिलीट; फॉलो करा सोप्प्या स्टेप्स 

googlenewsNext

Truecaller चा वापर अनोळखी नंबर्सची माहिती घेण्यासाठी केला जातो. एखादा नंबर तुमच्या फोनमध्ये सेव्ह नसेल तरीसुद्धा तुम्हाला तो नंबर कोणाचा आहे ते समजते. या अ‍ॅपमधून फक्त माहिती मिळत नाही तर अनावश्यक नंबर्स ब्लॉक देखील करता येतात. तसेच मोबाईल नंबर स्पॅम म्हणून मार्क करता येतात.  

फायदे असले तरी या ऍपमुळे आपली माहिती इतरांना देखील समजते. जर तुमचे नाव इतरांना कळू नये असे वाटत असेल तर तुम्ही Truecaller अकॉउंट डिलीट करू शकता. पुढे आम्ही True Caller अकॉउंट डिलीट करण्याची पद्धत सांगितली आहे.  

असे करा Truecaller अकॉउंट डिलीट 

  • सर्वप्रथम फोनवर Truecaller  अ‍ॅप ओपन करा. 
  • उजवीकडे वरच्या बाजूला असलेल्या 3 डॉट्सवर क्लिक करा. 
  • त्यानंतर Setting वर क्लिक करा आणि प्रायव्हसी सेंटरवर जा. 
  • त्यानंतर स्क्रॉल करून खाली दिलेल्या डीअ‍ॅक्टिव्हेट बटणवर क्लिक करा. 

मोबाईल नंबर अ‍ॅपवरून काढून टाकण्यासाठी 

  • तुमचा मोबाईल नंबर ट्रू कॉलरवरून काढून टाकण्यासाठी https://www.truecaller.com/unlisting वेबसाईट ओपन करा. 
  • इथे तुमच्या कंट्री कोडसह मोबाईल नंबर टाका. 
  • त्यानंतर खाली दिलेल्या Unlist बटनवर क्लिक करा. 

Web Title: How to delete your truecaller account and know here how to remove your number from truecaller 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.