शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

जुना डेटा न गमावता असा बदला व्हॉट्सअॅप नंबर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2018 13:37 IST

व्हॉट्सअॅप युजर्सची ही समस्या लक्षात विचारात घेऊन जुना डेटा न गमावता व्हॉट्सअॅप नंबर कसा बदलायचा हे जाणून घेऊया. 

ठळक मुद्देजुना व्हॉट्सअॅप नंबर बदलण्यासाठी Change Number फीचरचा वापर करता येतो. जुना डेटा न गमावता व्हॉट्सअॅप नंबर बदलणं सोपं झालं आहे. व्हॉट्सअॅप नंबरचे आधीचे मेसेज, माहिती, ग्रुप हे जुन्या नंबरवरून नव्या नंबरवर पाठवू शकता.

नवी दिल्ली - व्हॉट्सअॅप हे संवाद साधण्याचं प्रभावी माध्यम असल्याने अनेकजण त्याचा मोठ्याप्रमाणावर वापर करतात. मात्र काही कारणास्तव अनेकांना जुना व्हॉट्सअॅप नंबर बदलायचा असतो. त्यावेळी नंबर बदलल्यास सर्व डेटा डिलीट होतो. व्हॉट्सअॅप युजर्सची ही समस्या लक्षात विचारात घेऊन जुना डेटा न गमावता व्हॉट्सअॅप नंबर कसा बदलायचा हे जाणून घेऊया. 

जुना व्हॉट्सअॅप नंबर बदलण्यासाठी Change Number फीचरचा वापर करता येतो. या फीचरच्या माध्यमातून तुम्ही व्हॉट्सअॅप नंबरचे आधीचे मेसेज, माहिती, ग्रुप हे जुन्या नंबरवरून नव्या नंबरवर पाठवू शकता. Change Number चा वापर करून चॅट हिस्ट्री आपण त्याच फोनवरील नव्या नंबरवर अकाऊंटवर घेऊ शकतो. मात्र व्हॉट्सअॅप कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये तुमचा नंबर सेव्ह असणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच हे करताना फोनचं डेटा कनेक्शन अॅक्टीव्ह असणे गरजेचे आहे. 

असा करा नवा नंबर व्हॉट्सअॅपला कनेक्ट 

- नवीन नंबरचं नवं सिम फोनमध्ये टाका.

- आता तुमचं व्हॉट्सअॅप सुरू करा. 

- तुमचा जुना नंबर व्हेरिफाईड आहे का हे आधी चेक करा. यासाठी 'WhatsApp' च्या 'Menu Button' वर क्लिक करा. त्यानंतर 'Settings' मध्ये जाऊन प्रोफाईल फोटोवर टॅप करून व्हेरिफाईड नंबर जाणून घेऊ शकता. 

- टॉप बॉक्समध्ये जुना फोन नंबर टाका.

-  त्यानंतर बॉटम बॉक्समध्ये तुमचा नवा नंबर टाका.

- स्क्रीनवर वरती Done असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा. 

-  तुम्हाला तुमचा नवा नंबर व्हेरिफाय  करण्याचं सांगितलं जाईल. त्यानंतर तुम्ही नव्या नंबरवरून व्हॉट्सअॅप वापरू शकता. 

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअॅपtechnologyतंत्रज्ञान