Nokia चा 3650 हा आयकॉनिक फोन पुन्हा होऊ शकतो लाँच; पाहा अधिक माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2021 07:22 PM2021-02-03T19:22:33+5:302021-02-03T19:25:41+5:30

पाहा तुम्हाला आठवतोय का हा मोबाईल?

HMD looking to a modernized take on the Nokia 3650 do you remember this phone | Nokia चा 3650 हा आयकॉनिक फोन पुन्हा होऊ शकतो लाँच; पाहा अधिक माहिती

Nokia चा 3650 हा आयकॉनिक फोन पुन्हा होऊ शकतो लाँच; पाहा अधिक माहिती

Next
ठळक मुद्देNokia 3650 हा फोन 2003 मध्ये लाँच करण्यात आला होता.या मोबाईलमध्ये 4 एमबीचं स्टोरेजही देण्यात आलं होतं.

नोकियाच्या चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे. नोकियाचा एक आयकॉनिक फोन बाजारपेठेत पुनरागमन करू शकतो. हा फोन Nokia 3650 असण्याची शक्यता एका रिपोर्टमध्ये व्यक्त करण्यात आली आहे. कंपनी ही गेल्या काही काळापासून आपले आयकॉनिक फोन्स बाजारात आणत आहे. Nokia 3310 च्या पुनरागमनानंतर त्या फोनला उत्तम प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर कंपनीनं Nokia 8110 4G, बनाना फोन आणि Nokia 2720 फ्लिप हे फोन पुन्हा आणले होते. याव्यतिरिक्त कंपनीनं 2020 मध्ये Nokia 5310 आणि Nokia 6300 हे फोन्सही लाँच केले होते.

रशियन वेबसाईट Mobiltelefon.ru नं दिलेल्या माहितीनुसार नोकिया यावेळी काही वेगळं करण्याच्या तयारीत आहे. तसंच नोकिया यावेली आपला 3650 बा फोन पुन्हा लाँच करू शकते असंही सांगण्यात आलं आहे. तसंच कंपनी कोणता नवा फोन बाजारात आणेल याबाबतही शक्यता वर्तवण्यात येत आहेत. काही लोकांनी Nokia N95 पुन्हा लाँच होऊ शकतो अशी शक्यता व्यक्त केली आहे. नोकियाचे चीफ प्रोडक्ट ऑफिसर जुहो सारविकास यांनी मॉडर्न N95 स्मार्टफोनचा प्रोटोटाईपही दाखवला होता.

Nokia 3650 हा फोन 2003 मध्ये लाँच करण्यात आला होता. या मोबाईलमध्ये व्हीजीए कॅमेरा देण्यात आला होता. तसंच याचा मोबाईलचा बॉटम पार्ट हा गोलाकार होता. यात 2.1 इंचाचा टीएफटी डिस्प्ले देण्यात आला होता आणि त्याचं रिझॉल्यूश 176*208 पिक्सेल इतकं होतं. हा मोबाईल Symbian 6.1 ओएसवर चालत होता. तसंच यात वॉईस डायल, वॉईस रेकॉर्डिग अशा सुविधाही होत्या. नोकिया 3650 मध्ये 850 mAh ची बॅटरी देण्यात आली होती. तसंच याचं वजन 130 ग्रॅम असून त्यात ४ एमबीचं इंटरनल स्टोरेजही होतं. 

Web Title: HMD looking to a modernized take on the Nokia 3650 do you remember this phone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.