सावधान! फोनच्या स्क्रीनवर ग्रीन लाइट दिसतेय?; असू शकतो मोठा धोका, लगेच करा 'हे' काम

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2024 12:09 PM2024-01-29T12:09:11+5:302024-01-29T12:09:31+5:30

स्मार्टफोनमध्ये अनेक फीचर्स आहेत, ज्याचा वापर करून युजर्स सहजपणे हॅकिंग ओळखू शकतात.

here are some signs that someone may be spying on your phone | सावधान! फोनच्या स्क्रीनवर ग्रीन लाइट दिसतेय?; असू शकतो मोठा धोका, लगेच करा 'हे' काम

सावधान! फोनच्या स्क्रीनवर ग्रीन लाइट दिसतेय?; असू शकतो मोठा धोका, लगेच करा 'हे' काम

स्मार्टफोन हा आपल्या जीवनशैलीचा एक भाग झाला आहे. कोणताही फोन कॉल असो किंवा कोणतंही पेमेंट असो, जवळपास सर्व गोष्टी आता मोबाईलद्वारे शक्य आहे. तुमचा स्मार्टफोन हॅक झाल्यास किंवा तुमचे सीक्रेट्स कॉल कोणीतरी गुपचूप ऐकत असल्यास काय करावं? अशाच एका खास ट्रिकबद्दल जाणून घेऊया ज्यामध्ये यूजर्स सहज तपासू शकतात की त्यांचा स्मार्टफोन हॅक झाला आहे की नाही.

स्मार्टफोनमध्ये अनेक फीचर्स आहेत, ज्याचा वापर करून युजर्स सहजपणे हॅकिंग ओळखू शकतात. जेव्हा आपण फोनचा माइक वापरतो, तेव्हा अँड्रॉइड फोनच्या उजव्या बाजूला ग्रीन डॉटचा ऑप्शन येतो.

जर तुम्ही फोन वापरत नसाल किंवा तुम्हाला माइकचा एक्सेस नसला तरीही, वर उजवीकडे ग्रीन डॉट किंवा छोटा माईक आयकॉन दिसला, तर याचा अर्थ कोणीतरी तुमचं बोलणं ऐकत आहे. ते तुमचे सीक्रेट्स कॉ्स आणि सीक्रेट्स गोष्टी देखील ऐकू शकतात. 

स्मार्टफोन हॅकिंग शोधण्यासाठी हे एकमेव साइन नाही. याशिवाय, हॅकिंगबद्दल अनेक साइन आहेत. यामध्ये स्मार्टफोनची बॅटरी लवकर संपणं हे देखील हॅकिंगचं लक्षण आहे, कारण हॅकिंग दरम्यान बॅटरीवरील लोड वाढतो. फोनचा परफॉर्मन्स कमी असणं किंवा फोनचा वेग कमी असणे हे देखील हॅकिंगचं लक्षण आहे. फोन कॉल करताना मधून मधून बीप वा अन्य इलेक्ट्रॉनिक मशीनचा आवाज येत असेल तर हॅकिंग ओळखता येतं.

हॅकिंगपासून कसं करायचं संरक्षण?

जर तुम्हाला हॅकिंग इत्यादीपासून स्वतःला सुरक्षित ठेवायचं असेल, तर फोनमधून स्पाय एप काढून टाकणं महत्त्वाचं आहे. स्पाय एप्स अनेकदा गुपचूप काम करतात. मोबाईलच्या सेटिंगमध्ये जाऊन तुम्ही माइक किंवा कॅमेऱ्याची परमिशन चेक करू शकता. जर कोणत्याही एपला अनावश्यक परवानग्या मिळत असतील तर ते त्वरित अनइंस्टॉल करा.
 

Web Title: here are some signs that someone may be spying on your phone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.