हॅलो २- केपे येथे शिक्षकांना मार्गदर्शन
By Admin | Updated: July 10, 2015 21:26 IST2015-07-10T21:26:51+5:302015-07-10T21:26:51+5:30
सावर्डे : केपे गट सर्व शिक्षा अभियान कार्यालयातर्फे चार दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. बोरीमळ-केपे येथे झालेल्या इंग्रजी व गणित कार्यशाळेत तालुक्यातील प्राथमिक व उच्च प्राथमिक शिक्षकांनी सहभाग घेतला. इयत्ता तिसरी, चौथी व पाचवी विद्यार्थ्यांसाठी कृतिपत्रकांच्या माध्यमातून विषय सोपे करून शिकविणे या प्रशिक्षण कार्यशाळेचा उद्देश होता.

हॅलो २- केपे येथे शिक्षकांना मार्गदर्शन
स वर्डे : केपे गट सर्व शिक्षा अभियान कार्यालयातर्फे चार दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. बोरीमळ-केपे येथे झालेल्या इंग्रजी व गणित कार्यशाळेत तालुक्यातील प्राथमिक व उच्च प्राथमिक शिक्षकांनी सहभाग घेतला. इयत्ता तिसरी, चौथी व पाचवी विद्यार्थ्यांसाठी कृतिपत्रकांच्या माध्यमातून विषय सोपे करून शिकविणे या प्रशिक्षण कार्यशाळेचा उद्देश होता. निवृत्त मुख्याध्यापक तथा अभियानाचे प्रशिक्षक विठ्ठल आवदियेकर म्हणाले, स्थानिक भाष्यांच्या आधारे इंग्रजीचा अभ्यास अधिक उपयुक्त ठरतो. इंग्रजी शिकण्यासंदर्भातील दृष्टिकोन नेहमी व्यवहार्य असावा. विद्यार्थ्यांमधील विचार प्रक्रिया ही मातृभाषेतून होत असते. त्यामुळे अन्य भाषा व विषय शिकणे सोयीस्कर होते. तसेच प्राथमिक स्तरावर मुलांचे भाषेतील कच्चे दुवे हेरून त्यांना योग्य मार्गदर्शन करणे आवश्यक असते. तसेच प्रमाणित भाषा विद्यार्थ्यांना अवगत होणे जरूरीचे असल्याचे मत त्यांनी मांडले. कार्यशाळेत अभियानाचे प्रभाग प्रशिक्षक अर्चना वारीक भोसले, सीमा आवरोलकर, अनुराधा नाईक यांनी सखोल मार्गदर्शन केले. कार्यशाळेत कृतिपत्रके (वर्कशिट्स) तयार करून वानगीदाखल प्रात्यक्षिके सादर करण्यात आल्याचे सांगण्यात आले. समारोपप्रसंगी अभियानाच्या गट समन्वयक सीमा भेंडे यांनी मार्गदर्शन केले, तर गट प्रशिक्षक नम्रता जांबावलीकर यांनी आभार मानले. (लो. प्र.)