शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
6
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
7
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
8
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
9
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
10
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
11
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
12
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
13
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
14
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
15
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
16
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
17
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
18
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
19
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
20
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू

हुआवेचे दोन फिटनेस ट्रॅकर्स

By शेखर पाटील | Published: July 28, 2017 6:57 PM

हुआवे कंपनीने हृदयाच्या ठोक्यांची मोजणी करण्यास सक्षम असणारे हुआवे बँड २ आणि बँड २ प्रो हे दोन फिटनेस ट्रॅकर्स जाहीर केले आहेत.

हुआवे कंपनीने हृदयाच्या ठोक्यांची मोजणी करण्यास सक्षम असणारे हुआवे बँड २ आणि बँड २ प्रो हे दोन फिटनेस ट्रॅकर्स जाहीर केले आहेत.

वेअरेबल्य म्हणजेच परिधान करण्यायोग्य उपकरणांमध्ये जगभरात सध्या तरी फिटनेस बँड/ट्रॅकर लोकप्रिय आहेत. या पार्श्‍वभूमिवर हुआवे बँड २ आणि बँड २ प्रो हे दोन मॉडेल ग्राहकांना सादर करण्यात आले आहेत. वर नमूद केल्यानुसार यात हार्ट रेट मॉनिटर प्रणाली प्रदान करण्यात आली आहे. अर्थात युजरच्या हृदयाच्या ठोक्यांचे मापन करून याची त्याला वेळोवेळी माहिती देण्याची सुविधा या दोन्ही मॉडेल्समध्ये प्रदान करण्यात आली आहे. तर बँड २ प्रो या मॉडेलमध्ये याबाबत विश्‍लेषणासह सखोल माहितीची सुविधाही असेल. या दोन्ही मॉडेलमध्ये पॅसिव्ह मॅट्रीक्स ओएलईडी म्हणजेच पीएमओएलईडी या प्रकारातील वॉटरप्रुफ डिस्प्ले प्रदान करण्यात आले आहेत. हे दोन्ही बँड अँड्रॉइडच्या ४.४ तर आयओएसच्या ८.० तसेच यापुढील आवृत्त्यांवर चालणार्‍या स्मार्टफोनशी सुलभपणे कनेक्ट करता येतात. तर हुआवे बँड २ प्रो या मॉडेलमध्ये काही अतिरिक्त फिचर्स देण्यात आले आहेत. यात प्रामुख्याने फर्स्टबीट ही प्रणाली असून याच्या मदतीने बँडधारकाच्या शरिरातील ऑक्सीजनच्या वापराचे अचूक मापन करता येते. अर्थात  या माहितीचा स्टॅमिना वाढवण्यासाठी उपयोग होऊ शकतो. तर यामध्ये इनबिल्ट जीपीएस प्रदान करण्यात आले असून याच्या मदतीने चाललेल्या अंतराबाबतची अचूक माहिती मिळते. हे दोन्ही बँड निळा, काळा आणि लाल या तीन रंगांच्या पर्यायात उपलब्ध करण्यात येणार आहेत. मात्र ते प्रत्यक्षात भारतीय ग्राहकांना केव्हा मिळणार वा त्याचे मूल्य याबाबत अद्याप माहिती देण्यात आलेली नाही.