शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

हॅट्स ऑफ इंडियन आर्मी; लाँच केले व्हॉट्सअ‍ॅप सारखे मेसेंजिग अ‍ॅप SAI

By हेमंत बावकर | Updated: October 30, 2020 17:51 IST

Indian Army : आर्मी द्वारे बनविण्यात आलेले हे अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅप, टेलिग्राम, SAMVAD आणि GIMS सारखे काम करते. एंड टू एंड एनक्रिप्शन मेसेजिंग प्रोटोकॉलचा वापर करण्यात आला आहे.

'आत्मनिर्भर भारत' अभियानांतर्गत भारतीय आर्मीने एक नवीन मेसेजिंग अ‍ॅप डेव्हलप केले आहे. आर्मीने या अ‍ॅपला 'Secure Application for the Internet (SAI)' नाव दिले आहे. हे अ‍ॅप इंटरनेटद्वारे अँड्रॉईड प्लॅटफॉर्मवर एंड टू एंड सिक्युअर व्हॉईस, टेक्स्ट आणि व्हीडिओ कॉलिंग सर्व्हिस देणार आहे. गुरुवारी संरक्षण मंत्रालयाने ही माहिती दिली. 

मंत्रालयाने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे याची माहिती दिली. आर्मी द्वारे बनविण्यात आलेले हे अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅप, टेलिग्राम, SAMVAD आणि GIMS सारखे काम करते. एंड टू एंड एनक्रिप्शन मेसेजिंग प्रोटोकॉलचा वापर करण्यात आला आहे. SAI लोकल इन-हाउस सर्व्हर आणि कोडिंगद्वारे सुरक्षेसाठी इतर अ‍ॅपपेक्षा चांगले आहे. ही फिचर गरजेनुसार बदलताही येतात. 

हे अ‍ॅप CERT-in आणि आर्मी सायबर ग्रुपकडून तपासण्यात आले आहे. तसेच NIC वर इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राइट्स (IPR) साठी फायलिंगचे काम सुरु आहे. याशिवाय हे अ‍ॅप आयओएसवरही लाँच केले जाणार आहे. यासाठी डेव्हलपमेंट सुरु असल्याचे म्हटले आहे. संरक्षण मंत्रालयाने पुढे सांगितले की, SAI हे अ‍ॅप लष्करामध्ये वापरले जाणार आहे. कारण याची सेवा सुरक्षा पुरविणार आहे. अ‍ॅपचे फंक्शन रिव्ह्यू केल्यानंतर संरक्षण मंत्र्यांनी कर्नल साई शंकर यांना अ‍ॅप बनविण्यासाठी अभिनंदन केले. 

WhatsApp वेबवरून काम करणं सोपं होणार; व्हॉईस, व्हिडीओ कॉलिंगची मजा घेता येणार

व्हॉट्सअ‍ॅप हे संवाद साधण्याचं प्रभावी माध्यम असून त्याचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो. व्हॉट्सअ‍ॅप देखील नवनवीन फीचर्स आणून युजर्सचं चॅटिंग आणखी मजेशीर करत असतं. मात्र आता व्हॉट्सअ‍प वेब वापरताना देखील चॅटिंगची मजा आणखी वाढणार आहे. लवकरच व्हॉट्सअ‍प युजर्संना वेब व्हर्जनवर व्हॉईस आणि व्हिडीओ कॉलिंग फीचर मिळण्याची शक्यताआहे. एका नव्या रिपोर्टनुसार, व्हॉट्सअ‍ॅप आपल्या वेब व्हर्जनवर व्हॉईस आणि व्हिडीओ कॉलिंग आणण्यासाठी काम करत आहे. 

वेब व्हर्जन 2.2043.7 मध्ये आलेल्या एका नवीन अपडेटनंतर या फीचर पाहण्यात आलं होतं. कंपनी पब्लिक रिलीज आधी याची चाचणी करत आहे. व्हॉट्सअ‍ॅप व्हॉईस आणि व्हिडीओ कॉल आधीपासूनच अँड्रॉईड व आयओएस अ‍ॅपमध्ये उपलब्ध आहे. मात्र आता ही सुविधा डेकस्टॉप व्हर्जनवर देखील मिळू शकते. व्हॉट्सअ‍ॅप फीचरला ट्रॅक करणारे ट्विटर अकाउंट WABetaInfo च्या रिपोर्टनुसार, लेटेस्ट अपडेट सोबत व्हॉट्सअ‍ॅपच्या डेस्कटॉप व्हर्जनवर 2.2043.7 व्हॉईस आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी सपोर्ट इंटिग्रेटेड आहे. 

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानWhatsAppव्हॉट्सअ‍ॅप