शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
4
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
5
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
6
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
7
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
8
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
9
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
10
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
11
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
12
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
13
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
14
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
15
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
16
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
17
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
18
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
19
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
20
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी

WhatsApp चं भन्नाट फीचर; आपल्या मर्जीने ग्रुपमध्ये अ‍ॅड होणार युजर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2019 16:08 IST

फेक न्यूज रोखण्यासाठी टिपलाइन नंबर नंतर आता व्हॉट्सअ‍ॅपने ग्रुप मेंबरशी संबंधित एक प्रायव्हसी सेटींग फीचर भारतात लाँच केलं आहे.

ठळक मुद्देव्हॉट्सअ‍ॅपने ग्रुप मेंबरशी संबंधित एक प्रायव्हसी सेटींग फीचर भारतात लाँच केलं.एखादा ग्रुप अ‍ॅडमिन युजरला ग्रुपमध्ये अ‍ॅड करू शकणार की नाही हे ठरवण्यासाठी युजर्सना एक पर्याय देण्यात येणार.व्हॉट्सअ‍ॅपचं नवीन व्हर्जन अपडेट केल्यानंतर सर्व युजर्सना ही सुविधा मिळणार आहे.

नवी दिल्ली -  व्हॉट्सअ‍ॅप हे संवाद साधण्याचं अत्यंत प्रभावी माध्यम आहे. युजर्सचं चॅटिंग आणखी मजेशीर व्हावं यासाठी व्हॉट्सअ‍ॅप सातत्याने नवनवीन फीचर आणत असतं. फेक न्यूज रोखण्यासाठी टिपलाइन नंबर नंतर आता व्हॉट्सअ‍ॅपने ग्रुप मेंबरशी संबंधित एक प्रायव्हसी सेटींग फीचर भारतात लाँच केलं आहे. एखादा ग्रुप अ‍ॅडमिन युजरला ग्रुपमध्ये अ‍ॅड करू शकणार की नाही हे ठरवण्यासाठी युजर्सना एक पर्याय देण्यात येणार आहे. बुधवारी (3 एप्रिल) अ‍ॅन्ड्रॉईड युजर्ससाठी हे फीचर लाँच करण्यात आले आहे.

व्हॉट्सअ‍ॅपचं नवीन व्हर्जन अपडेट केल्यानंतर सर्व युजर्सना ही सुविधा मिळणार आहे. भारतातील निवडणुकांआधी येणारं हे फीचर अनेकांना फायदेशीर ठरणार आहे. अनेकदा युजर्सच्या मनात नसताना त्यांना वेगवेगळ्या ग्रुपमध्ये अ‍ॅड केलं जातं. मात्र नंतर मेसेजला कंटाळून युजर्स तो ग्रुप लेफ्ट करण्याचा निर्णय घेतात. त्यामुळे युजर्सना आता व्हॉट्सअ‍ॅपच्या ग्रुप इन्विटेशन या फीचरचा फायदा होणार आहे. 

- सर्वप्रथम व्हॉट्सअ‍ॅपच्या सेटींगमध्ये जाऊन अकाऊंट ऑप्शनवर क्लिक करा. 

- प्रायव्हसी सेक्शनमध्ये जाऊन ग्रुप्सवर क्लिक करा. 

WhatsApp चे 'हे' 5 फीचर्स करणार कमाल; चॅटिंग करताना येणार धमाल 

- क्लिक केल्यानंतर तीन पर्याय दिसतील. एवरीवन, माय कॉन्टॅक्ट आणि नोबडी या तीन पर्यायापैकी एका पर्याय निवडा.

- नोबडी या पर्याय निवडला तर कोणताही ग्रुप अ‍ॅडमिन तुमच्या परवानगी शिवाय तुम्हाला ग्रुपमध्ये अ‍ॅड करू शकणार नाही.

WhatsApp वर क्वालिटी खराब न करता 'असे' पाठवा फोटो

- माय कॉन्टॅक्ट्स असा पर्याय निवडला तर तुमच्या फोनमधील अ‍ॅड्रेस बुकमध्ये असलेले युजर्स तुम्हाला कोणत्याही ग्रुपमध्ये अ‍ॅड करू शकतात. 

- सेटींगमधील तीन पर्यायापैकी कोणताही एक पर्याय निवडल्यास अ‍ॅडमिनकडून एक नवीन चॅट मेसेज पाठवला जाईल. त्यामध्ये तुमच्या कडे ग्रुपमध्ये अ‍ॅड करण्यासाठी परवानगी मागितली जाईल. 

असा तपासा व्हॉट्सअ‍ॅपवर येणारा फेक मॅसेज

निवडणुकीचा हंगाम, आरोग्य आणि इतर अनेक गोष्टींवर सकाळ संध्याकाळ व्हॉट्सअ‍ॅपवर मॅसेज येत असतात. जवळच्या व्यक्तीने पाठविला असल्याने आपण त्यावर लगेचच विश्वास ठेवतो. जरा थांबा. कशावरून त्या व्यक्तीने तो मॅसेज वाचूनच पुढे पाठविला असेल. खोटा मॅसेज परविणाऱ्याचे हेतू वेगवेगळे असतात. यामुळे व्हॉट्सअ‍ॅपने हे मॅसेज खरे की खोटे हे करण्यासाठी नुकतेच एक टूल लाँच केले आहे. यास 'Checkpoint Tipline' अस नाव दिले आहे. PROTO या भारतीय मीडिया स्टार्टअप कंपनीने हे टूल विकसित केले आहे. PROTO ही कंपनी निवडणूक काळात पसरविले जाणार मॅसेज त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी काही संस्थांच्या शोधात आहे. अशा मॅसेजचा शोध लागल्यास त्याद्वारे होणाऱ्या दंगली, अफवा थांबविण्यात यश येणार आहे.

WhatsApp वर 'हे' जबरदस्त फीचर येणार, नको असलेल्या ग्रुपपासून सुटका होणार

व्हॉट्सअ‍ॅप हे संवाद साधण्याचं अत्यंत प्रभावी माध्यम आहे. व्हॉट्सअ‍ॅप 'ग्रुप इन्विटेशन' हे नवीन फीचर देखील लवकरच लाँच करणार आहे. या फीचरमुळे युजर्संना कोणत्याही ग्रुपमध्ये अ‍ॅड करण्याआधी तुमची परवानगी घेणं गरजेचं असणार आहे. व्हॉट्सअ‍ॅपचं हे नवं फीचर इन्विटेशनच्या आधारे काम करणार आहे. सध्या या फीचरची चाचणी सुरू आहे.  WABetaInfo ने दिलेल्या माहितीनुसार, हे फीचर iOS व्हर्जनसाठी उपलब्ध असणार आहे. तसेच 'ग्रुप इन्विटेशन' हे फीचर 'Privacy' सेक्शन मध्ये असणार आहे. 

WhatsApp वर आलं नवं फीचर, मेसेज कितीवेळा फॉरवर्ड झाला हे समजणारकाही महिन्यांपूर्वी व्हॉट्सअ‍ॅपने फॉरवर्ड मेसेजवर मर्यादा आणली होती. मात्र आता त्यामध्ये बदल करत व्हॉट्सअ‍ॅपने एक नवीन फीचर आणलं आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या या नव्या फीचरमध्ये 'Forwarding Info' आणि 'Frequently Forwarded' यांचा समावेश करण्यात आला आहे. यातील फॉरवर्डिंग इन्फोमुळं मेसेज कितीवेळा फॉरवर्ड केला आहे याची माहिती मिळणार आहे. WABetaInfo ने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीने हे नवे फीचर iOS आणि अ‍ॅन्ड्रॉईडच्या बीटा व्हर्जनवर लाँच केले आहे. iOS बीटा 2.19.40.23 आणि Android बीटा 2.19.86 व्हर्जनवर हे अपडेट दिसणार आहे.

WhatsApp वरच्या चॅटिंगची गंमत वाढणार, 230 नवीन इमोजी येणारव्हॉट्सअ‍ॅपवर शब्दांऐवजी भावना व्यक्त करण्यासाठी इमोजीचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. आता व्हॉट्सअ‍ॅपवरच्या चॅटिंगची गंमत आणखी वाढणार आहे कारण इमोजीच्या लिस्टमध्ये 230 नवीन इमोजींचा लवकरच समावेश होणार आहे. युनिकोडने 2019 साठी नवीन 230 इमोजीची अधिकृत लिस्ट जाहीर केली आहे. व्हॉट्सअ‍ॅपवरील इमोजीच्या लिस्टमध्ये 59 नवीन इमोजीमध्ये 171 व्हेरिअंटचा समावेश आहे. या नवीन इमोजीमध्ये प्राणी, फळ, भाज्या, मेकॅनिकल आर्म, वेफल, आईस क्यूब, ब्लड ड्रॉप, बटर, रिक्षा अशा अनेक इमोजींचा समावेश आहे.

 

टॅग्स :WhatsAppव्हॉटसअ‍ॅपtechnologyतंत्रज्ञान