शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

कॉल ड्रॉप आणि इंटनेटच्या स्लो स्पीडपासून होणार सुटका; सरकार घेणार मोठा निर्णय 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2022 15:14 IST

Call Drop Issue: कॉल ड्रॉप आणि स्लो इंटरनेट डेटा स्पीडबाबत सरकार मोठे पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे.

नवी दिल्ली : तुम्ही कॉल ड्रॉप (Call Drop) किंवा स्लो इंटरनेट स्पीड  (Slow Internet Speed) समस्येचा सामना करत असाल तर आता तुम्हाला याबद्दल काळजी करण्याची गरज नाही. कॉल ड्रॉप आणि स्लो इंटरनेट डेटा स्पीडबाबत सरकार मोठे पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टेलिकॉम डिपार्टमेंट (Telecom Department) यावर कारवाई करणार आहे. 

सरकार लवकरच टेलिकॉम कंपन्यांना सेवेची क्वालिटी सुधारण्याच्या सूचना देणार आहे. यासाठी टेलिकॉम सचिवांनी 28 डिसेंबरला टेलिकॉम  कंपन्यांसोबत बैठकही बोलावली आहे. या बैठकीत यासंदर्भात मोठा निर्णय घेतला जाणार आहे. अनेकदा युजर्स मध्येच कॉल डिस्कनेक्ट झाल्याची तक्रार करतात. याशिवाय, इंटरनेटचा स्लो स्पीड युजर्सचा मूड खराब होतो. युजर्सची ही समस्या सोडवण्यासाठी टेलिकॉम डिपार्टमेंट अॅक्टिव्ह मोडमध्ये आले आहे. त्यामुळे येत्या काळात या समस्येतून सुटका करण्यासाठी सरकार नवीन नियम जारी करू शकते.

टेलिकॉम डिपार्टमेंट भारतीय टेलिकॉम सेक्टरमधील सर्व कंपन्यांना सेवा सुधारण्यासाठी सूचना देईल. यासंदर्भात टेलिकॉम सचिवांनी टेलिकॉम कंपन्यांसोबत बैठक बोलावली आहे. 28 डिसेंबर रोजी होणाऱ्या या बैठकीत टेलिकॉम कंपन्यांचे टॉप अधिकारीही सहभागी होणार आहेत. या बैठकीत कॉल ड्रॉप आणि स्लो इंटरनेट स्पीडबाबत मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो. अशा परिस्थितीत सरकार युजर्सच्या हितासाठी काही मोठे पाऊल उचलू शकते, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

अचानक सेवेच्या क्वालिटीवर परिणाम का?सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 5G सुरू झाल्याने टेलिकॉम सेवेच्या क्वालिटीवर परिणाम झाला आहे. टेलिकॉम कंपन्यांच्या सेवेच्या क्वालिटीवर सरकार खूश नाही. या प्रकरणी टेलिकॉम विभागाने ट्रायला (TRAI) पत्र लिहिले आहे. टेलिकॉम डिपार्टमेंटने ट्रायकडे सेवांचे नियम कडक करण्याची मागणी केली आहे, जेणेकरून सेवा सुधारून युजर्सना फायदा मिळू शकेल.

देशात 115 कोटी ग्राहक कॉल ड्रॉप आणि इंटरनेटचा स्पीड कमी असल्याने टेलिकॉम सेवेची स्थिती चांगली नाही. ट्राय आणि टेलिकॉम कंपन्या यांनी सोबत मिळून तोडगा काढावा, अशी सरकारची इच्छा आहे. दरम्यान, देशात 115 कोटी ग्राहक आहेत, परंतु ग्राहकांच्या तुलनेत पायाभूत सुविधा कमकुवत आहेत.

टॅग्स :technologyतंत्रज्ञानSmartphoneस्मार्टफोनInternetइंटरनेटbusinessव्यवसाय5G५जी