शहरं
Join us  
Trending Stories
1
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
2
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
3
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
4
Shubham Dubey : सरकारी नोकरीत रिजेक्टचा ठपका; मग एका रात्रीत 'करोडपती' होऊन तो IPL स्टार कसा बनला?
5
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
6
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
7
भ्रष्टाचाराची तक्रार केली, ग्राम प्रमुखाला जेव्हा कळलं तेव्हा झाला 'मोठ्ठा कांड'! काय घडलं?
8
Travel Tips: फिरण्याची आवड आहे पण खिशाला परवडत नाही? जगभ्रमंतीची 'अशी' फिटवा हौस 
9
Sandeepa Virk : "दिग्दर्शक रात्री खोलीत शिरला, केली घाणेरडी मागणी"; अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
10
IMDb Play Trick: सावधान! IMDb वर मोफत चित्रपट पाहण्याचा 'हा' जुगाड पडू शकतो महागात!
11
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
12
विराटच्या खांद्याला खांदा लावून वर्ल्डकप जिंकला, आता IPL 2026 मध्ये करतोय पंचगिरी, कोण आहे 'हा' खेळाडू?
13
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
14
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
15
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
16
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
17
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
18
नवरदेव झिंगत डुलत आला, कारमधून उतरताना लटपटला, संतप्त वधूने तिथेच लग्न मोडले
19
आलिशान गाडी अन् ५५ लाख, 'मॅडम कलेक्टर'चा पर्दाफाश; नोकरीच्या नावाखाली तरुणांना फसवलं
20
Watermelon Price: मुंबईतील 'त्या' घटनेनंतर कलिंगडाचे दर कोसळले, आता किती रुपयांना मिळतंय?
Daily Top 2Weekly Top 5

चुकूनही डाऊनलोड करू नका 'अशी' अ‍ॅप्स, होईल नुकसान; मोदी सरकारचं आवाहन

By कुणाल गवाणकर | Updated: September 22, 2020 21:28 IST

कोरोना काळात बोगस अ‍ॅप्सचा सुळसुळाट; माहिती चोरीला जाण्याचा मोठा धोका

नवी दिल्ली: कोरोना काळात अनेक अ‍ॅप्सच्या मदतीनं डेटा चोरी करण्याचे प्रकार अगदी सर्रासपणे सुरू आहेत. कोरोनाची लागण झाल्यावर शरीरातील ऑक्सिजनचं प्रमाण कमी होतं. त्यामुळे शरीरातील ऑक्सिजनचं प्रमाण सातत्यानं तपासून पाहण्याचं आवाहन करण्यात येत आहे. याचाच गैरफायदा काही बोगस अ‍ॅप्स निर्मात्यांकडून घेतला जात आहे. त्यामुळे शरीरातील ऑक्सिजनचं प्रमाण तपासणारी कोणतीही अ‍ॅप्स अज्ञात यूआरएलच्या माध्यमातून डाऊनलोड करू नका, असं आवाहन केंद्र सरकारनं केलं आहे.  ऑनलाईन फसवणुकीपासून लोकांना दूर ठेवण्यासाठी सरकारकडून सायबर दोस्त नावाचं ट्विटर हँडल सुरू करण्यात आलं आहे. या ट्विटर हँडलवरून शरीरातलं ऑक्सिजन तपासणाऱ्या बोगस ऑक्सिमीटर अ‍ॅप्सबद्दल नागरिकांना सतर्क करण्यात येत आहे. 'अज्ञात यूआरएलच्या मदतीनं ऑक्सिमीटर अ‍ॅप्स डाऊनलोड करू नका. ही अ‍ॅप्स वापरकर्त्यांच्या शरीरातील ऑक्सिजन तपासत असल्याचा दावा करतात. मात्र ही अ‍ॅप्स फेक असू शकतात. या अ‍ॅप्सच्या माध्यमातून तुमची खासगी माहिती, फोटो, संपर्क क्रमांक आणि इतर तपशील चोरीला जाऊ शकतो. ही अ‍ॅप्स वापरकर्त्यांकडे बायोमेट्रिक फिंगरप्रिंट मागतात. त्यामुळे या अ‍ॅप्सच्या माध्यमातून बायमेट्रिक माहितीदेखील चोरी होण्याचा धोका असतो,' असं सायबर दोस्तनं म्हटलं आहे.नागरिकांनी त्यांच्या शरीरातील ऑक्सिजनच्या प्रमाणावर लक्ष ठेवावं, असं आवाहन सातत्यानं आरोग्य मंत्रालयाकडून करण्यात येत आहे. शरीरातील ऑक्सिजनचं प्रमाण कमी होणं धोक्याचं लक्षण आहे. त्यामुळे बाजारासह ई-कॉमर्स साईट्सवर ऑक्सिमीटर्स उपलब्ध आहेत. मात्र तरीही अनेकजण अ‍ॅप्सच्या माध्यमातून शरीरातील ऑक्सिजनचं प्रमाण मोजण्याचा पर्याय निवडतात. मात्र यामध्ये बोगस अ‍ॅप्सच्या माध्यमातून खासगी माहिती चोरीला जाण्याचा मोठा धोका आहे. केंद्रीय गृह मंत्रालयानं ऑनलाईन फसवणुकीपासून सतर्क करण्यासाठी सायबर दोस्त ट्विटवर हँडल सुरू केलं आहे. या माध्यमातून सायबर गुन्ह्यांबद्दल जागरूकता निर्माण करण्याचं काम करण्यात येतं. या महिन्याच्या सुरुवातीला सायबर दोस्तनं व्हेरिफिकेशन आणि ऑथेंटिकेशन पूर्ण झाल्यानंतरच ई-वॉलेट अ‍ॅप्स स्मार्टफोनमध्ये डाऊनलोड करण्याचा सल्ला दिला होता. अ‍ॅपलच्या अ‍ॅप स्टोर आणि गुगलच्या प्ले स्टोरमधूनच अ‍ॅप्स डाऊनलोड करा. एसएमएस, ईमेल किंवा सोशल मीडियावरून येणाऱ्या लिंकवरून अ‍ॅप्स डाऊनलोड करू नका. त्यातून फसवणूक होण्याचा धोका असल्याची सूचना सायबर दोस्तनं केली होती.