Googleची मोठी भेट! आता ग्राहकांना 15GB ऐवजी मिळणार तब्बल 1TB स्टोरेज, जाणून घ्या डीटेल्स...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2022 04:13 PM2022-10-31T16:13:02+5:302022-10-31T16:13:13+5:30

आतापर्यंत गूगलकडून प्रत्येक यूजरला मोफत 15GB क्लाउड स्टोरेज मिळायचे.

Google's Big Gift! Now customers will get 1TB storage instead of 15GB, know the details | Googleची मोठी भेट! आता ग्राहकांना 15GB ऐवजी मिळणार तब्बल 1TB स्टोरेज, जाणून घ्या डीटेल्स...

Googleची मोठी भेट! आता ग्राहकांना 15GB ऐवजी मिळणार तब्बल 1TB स्टोरेज, जाणून घ्या डीटेल्स...

googlenewsNext

Google ने यूजर्सना मोठी भेट दिली आहे. आतापर्यंत गूगलकडून प्रत्येक यूजरला मोफत 15GB क्लाउड स्टोरेज मिळायचे. पण, आता गूगलने 15GB स्टोरेजऐवजी तब्बल 1TB सिक्योर क्लाउड स्टोरेज मिळणार आहे. याशिवाय, जुन्या यूजर्सचे अकाउंट अपग्रेड केले आहेत. यासाठी यूजरला काहीच करण्याची गरज नसेल.

Google कडून ग्राहकांना ही मोठी खुशखबरी मिळाली आहे. कंपनीने Workspace यूजरसाठी स्टोरेज कॅपेसिटी वाढवली आहे. म्हणजेच, Google Workspace इंडिव्हिज्युअल अकाउंट 15GB स्टोरेजऐवजी 1TB सिक्योर क्लाउड स्टोरेज मिळेल. यासाठी तुम्हाला कोणतीच वेगळी सेटिंग करण्याची गरज नाही. सर्व अकाउंट्स ऑटोमॅटिकली 15GB स्टोरेजवरुन 1TB स्टोरेजमध्ये कन्व्हर्ट होतील.

गूगलने एका ब्लॉगपोस्टमधून याबाबत माहिती दिली. कंपनीच्या ब्लॉग पोस्टनुसार, वर्कस्पेस इंडिव्हिज्युअल यूजर्ससाठी ज्यास्त फीचर्सदेखील आणले जातील. तुमच्या माहितीसाठी सांगू इच्छितोत की, गूगल Workspace (आधी GSuite) एक क्लाउड-बेस्ड प्रोडक्टिव्हिटी सूट आहे. हे इंडिव्हिज्युअल यूजर आणि ऑफिस टीमला कोणत्याही ठिकाणाहून काम करण्याची सुविधा देते.

सध्या जगभरात Google Workspace साठी 8 मिलियन यूजर्स गूगलला पे करतात. यातील 2 मिलियन ग्राहक, गेल्या दोन वर्षात वाढले. कोरोना काळात वाढलेल्या रिमोट वर्कमुळे ही वाढ झाली. तुम्ही गूगल वर्कस्पेसचा वापर करत नसाल, तर तुम्हाला ही सुविधा मिळणार नाही. गूगल वर्कस्पेस वापरण्यासाठी कंपनीचा सब्सक्रिप्शन प्लॅन घ्यावा लागतो. हा प्लॅन 125 रुपये प्रति महिन्यापासून सुरू होतो.
 

Web Title: Google's Big Gift! Now customers will get 1TB storage instead of 15GB, know the details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.