शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

नोकरी सोडून गेलेल्या कर्मचाऱ्याला Google ने परत बोलावले; पगार तब्बल 22,000 कोटी रुपये!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2024 18:53 IST

गुगलने या कर्मचाऱ्याकडे आपल्या एका महत्वकांशी प्रोजेक्टची जबाबदारी दिली आहे.

Google Paid $2.7 Billion To Rehire AI Expert : टेक इंडस्ट्रीतील दिग्गज कंपनी Google ने आपल्या एका माजी कर्मचाऱ्याला पुन्हा कामावर घेतले आहे. विशेष म्हणजे, यासाठी कंपनीला मोठी रक्कम मोजावी लागली आहे. आर्टिफिशियल इंटेलिजेंस(Ai) जीनियस म्हटल्या जाणाऱ्या या व्यक्तीचे नाव नोम शजिर आहे. गुगलवर रागावून त्याने नोकरीचा राजीनामा दिला होता. आता गुगलने त्याला पुन्हा कामावर घेण्यासाठी तब्बल 2.7 बिलियन डॉलर्स, म्हणजेच सुमारे 22 हजार कोटी रुपयांची ऑफर दिली आहे.

48 वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर Noam Shajir ने 2000 साली गुगलमध्ये नोकरीला सुरुवात केली. जवळपास 20-21 वर्षे कंपनीत काम केल्यानंतर नोमने 2021 मध्ये कंपनीला राम-राम ठोकला. नोमने Google कडे चॅटबॉट जारी करण्याची विनंती केली होती, पण कंपनीने ती नाकरली. याचाच राग मनात धरुन त्याने कंपनी सोडली आणि मित्र डॅनियल डी फ्रेटाससोबत Character.AI नावाचा नवीन स्टार्टअप सुरू केला. 

त्यांची ही कंपनी सिलिकॉन व्हॅलीतील सर्वात चमकदार कामगिरी करणाऱ्या स्टार्टअप्सपैकी एक बनली. दरम्यान, आता Google ने त्यांचे AI युनिट DeepMind मध्ये सामील करण्याची घोषणा केली आहे. यासाठी नोम शजिरच्या Character.AI चे तंत्रज्ञान कामी येणार असल्यामुळे गुगलने शजिरला परत कंपनीत काम करण्याची ऑफर दिली. यासाठी कंपनी नोमला तब्बल $2.7 अब्ज देणार आहे. 

या कारणास्तव गुगल सोडले2017 मध्ये नोमने मीना नावाचा एक अतिशय प्रगत चॅटबॉट विकसित केला होता. हा अनेक समस्या सोडवू शकत होता. त्याने हा चॅटबॉट सुरू करण्याची कंपनीकडे विनंती केली. पण, त्यावेळी गुगलच्या उच्च व्यवस्थापनाने त्याची विनंती अमान्य केली. यामुळे नाराज झालेल्या शजिरने कंपनी सोडून स्वतःचा व्यवसाय सुरू केला.

शजिर आता गुगलसाठी काय करणार?Google मध्ये परतल्यानंतर शजिर कंपनीच्या Gemini Ai चे पुढील व्हर्जन तयार करणाऱ्या टीमचे नेतृत्व करेल. OpenAI च्या ChatGPT सारख्या प्रतिस्पर्ध्यांना आव्हान देण्यासाठी Google ने Gemini AI तयार केले आहे. आता शजिर याचे नेतृ्त्व करणार आहे. 

टॅग्स :googleगुगलtechnologyतंत्रज्ञानEmployeeकर्मचारी